top of page

"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग २६"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 4 min read

"मणिपूर संघर्षामागचे धर्मशास्त्र - भाग २६"

©दिलीप वाणी,पुणे

वरवर "हिंदू-ख्रिश्चन धार्मिक संघर्षा" चे स्वरूप धारण केलेल्या मणिपूर संघर्षाला रोज नवनवीन आयाम प्राप्त होत आहेत.जयाने पाठवलेला आजचा "खनिज संपत्ती" चा

कम्युनिस्ट विचारसरणीला लगेच त्यात देशातील "धनदांडग्यांचे हितसंबंध" दिसू लागले आहेत.यात "सोरोश" पेक्षा बाप असलेल्या एका संस्थेचा "आंतरराष्ट्रीय कावा" असल्याचे देखील आज एकाने सांगीतले आहे.अभ्यास झाला की सांगतो. तो पर्यंत "लोकसंख्येचा विस्फोट" कसा थांबवायचा याच्यावर विचार करा.तो पर्यंत मी जयाच्या या पोस्टचा अभ्यास करून ठेवतो.

"एससी/एसटी एम्प्लॉईज असोसिएशन" चे पदाधिकारी असलेल्या गृहस्थांनी मांडलेले हे मत आदिवासी समाजाचे प्रातिनिधिक मत समजायचे का ? "हिंदू-ख्रिश्चन धार्मिक संघर्षा" चे स्वरूप धारण केलेल्या मणिपूर संघर्षाला आधीच "मैती-कुकी संघर्ष" हे "जातीय स्वरूप" प्राप्त झालेले आहे. त्याला आज "आदिवासी-बिगरआदिवासी संघर्ष" असे नवीनच परिमाण प्राप्त झालेले आहे.हाच "भारतीयांचा इतिहास" आहे व हीच "भारतीय संस्कृती" आहे.याचा गैरफायदा वर्षानुवर्षे परकीयांनी घेतलेला आहे व आजही घेतला जाणार आहे.सुलोचना चव्हाणची लावणी आठवली. "फड सांभाळ तुर्‍याला गं आला" ! कोणता "लांडगा" या खनिजांना लागणार आहे त्याकडे बारकाईने लक्ष हवे.देशी का परदेशी ?

१. नॉर्थ ईस्टचे(रुणाचल प्रदेश)चे माजी केंद्रीय कायदेमंत्री श्री.किरण रिजिजू यांना एका विशिष्ट हेतूने "भूविज्ञान मंत्रालय" देण्यात आले आहे.

२. २०१५ मध्ये नॉर्थ इस्टच्या डोंगराखाली "अमूल्य खनिजे" असल्याचा सर्वे समोर आला होता.

३. २०१७ मध्ये मणिपूर मध्ये भाजपचे बीरेन सिंगचे सरकार आले आणि लगेचच अडाणी आणि कंपनीने तिकडचे खनिज पट्टे बोली लावत नावे करून घेतले.

४. कुकी आदिवासीच्या ताब्यात असलेली जमीन फक्त आदिवासीच खरेदी करू शकतो आणि त्याची संमती नसेल तर तिथे उद्योग सुरु होऊ शकत नाही.

५. बिरेन सिंग मैतेइ जातीतून येतो.हा समाज शेती करतो, उद्योग-व्यवसाय करतो,संपन्न अशा या समाजाला 'आदिवासी' घोषित करण्यासाठी वेगवेगळे सर्वे घडवून आणले गेले.

६. सर्व्हे करतांना कुकी वस्त्या वेगळ्या आहेत त्यांना मार्क केले गेलेच होते पण जिथे मिश्र वस्त्या होत्या तेथील कुकी घरांवर गुलाबी रंगाने मार्किंग करून ठेवले.

७. मार्च महिन्याच्या सुमारास एक आदेश काढून सर्व कुकी जमातींना त्यांच्याकडील लायसन्स आर्म फोर्सकडे जमा करण्यास भाग पाडले.

८. हायकोर्टाने केंद्र शासनाच्या अधिकारांवर अतिक्रमण करत, गतिशीलता दाखवत स्वतःच मैतेइ जातीला 'आदिवासी' असल्याचे घोषित केले.कुकी जमातीने त्याला विरोध केला, ३ मे रोजी आंदोलन आयोजित केले,मैतेइ पूर्ण तयारीत होते याचा विरोध करायला.

९.आंदोलन संपवून परत जाणाऱ्या कुकिंवर शसस्त्र हल्ले केले गेले, त्यांचे स्मारक ध्वस्त केले गेले, दिल्लीतला एक जुना व्हिडिओ मोर्फ करून 'कुकींनी मैतेइ मुलीवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ व्हायरल करून आग भडकविण्यात आली आणि मग सुरू झाले सरकार पुरस्कृत मास किलिंग !

१०.पोलीस अकॅडमी व विविध पोलीस स्टेशनवर हल्ला करून जमावाने AK45 व इतर आधुनिक हत्यारे पळवून नेल्याची "स्क्रिप्ट" व्यवस्थित प्रत्यक्षात आणून घेतली व तसं न्यूज चॅनेलच्या माध्यमातून देशाला सांगून टाकलं. पाठोपाठ इंटरनेट बंद करून तेथील काहीही सत्य बाहेर जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली.

११.केंद्रातून पॅरामिल्ट्री मागवली जी कुकी आदिवासींना संरक्षण करण्याऐवजी मैतेइ वस्त्यांवर संरक्षणार्थ लावून स्थानीक पोलिसांना मैतेइ अतिवाद्यांसोबत आदिवासी कुकी वस्त्यांवर हल्ला करण्यासाठी पाठविले. नुसत्या बंदुका नाही तर रासायनिक विस्फोटकांचे साठे करून मैतेई अतिरेकी कुकींच्या समूळ नायनाट करण्याच्या तयारीत आहेत.

१२.बीरेन सिंग व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूढील सगळी योजना "फुलप्रूफ" तयार ठेवली आहे, कुठेही काहीही बभ्रा होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली आहे.

१३.शेकडो गावं, वस्त्यामध्ये जाऊन मैतेइ खुलेआम कत्तली करत सुटले. १० वर्षाची मुलगी असो वा ६० वर्षाची म्हातारी त्यांना सामूहिक बलात्कार करून खून केले, माणसांची मुंडकी कापून वस्त्यांच्या मध्यभागी खुंटीवर टांगून ठेवली आणि गावं-वस्त्या जाळून राख केल्या. रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येनं प्रेत ताठरून, सडून पडली आहेत, आणखीही बरंच काही आहे जे समोर यायचं आहे.

१४.जेसीबी ने मोठाले खड्डे खोदून शेकडो कुकी गाडून टाकले गेले आहेत आणि ही सर्व गावं आता मैतेईंच्या ताब्यात आहे, उद्या त्यांच्या नावे पण केली जातील.

मग सरकारी सोपस्कार पार पाडून हे सर्व डोंगर पट्टे अडाणीला दिले जातील आणि सुंदर असा नॉर्थ ईस्ट "केजीएफ च्या खदानी" सारखा होणार आहे, जिथे कुकी आदिवासी गुलाम म्हणून राबवले जातील, शोषित होतील आणि किड्या मकोड्यांसारखे मरतील.

१५.येत्या काही दिवसांत तिकडचे अनेक व्हिडिओ, फोटो समोर येणार आहेत जे आपल्याला माणूस म्हणवून घेण्याची लाज आणणार आहेत.

१६.सरकार दरबारी राबणारे न्यूज चॅनेल आणि भक्त यांपैकी कशालाच भीक घालणार नाही उलट बांग्लादेशी मुस्लिम, पाकिस्तान व चीन असे काय काय अँगल लावून जे झालं ते योग्यच झालं आहे याबद्दल मोठमोठ्या पोस्ट, रकाने लिहतील, आपण ते वाचायचं आणि षंढ बनून गप्प बसायचं...त्या कुकींच्या लाईनीत आपला नंबर येईपर्यंत !

👉फॉरवर्ड : उत्तम शेवडे,बसपा🐘)

[25/07, 10:05] Patil(Todmal) Jaya BJMC: मणिपूरची परिस्थिती आणि तिथे चाललेल्या नरसंहाराबद्दल ज्येष्ठ पत्रकार सौमित्र राय यांनी केलेला खुलासा वाचा -

मी तुम्हाला मणिपूरची खरी गोष्ट सांगतो. ही गोष्ट केवळ मणिपूरचीच नाही तर देशातील सर्व राज्यांची आहे जिथे आदिवासी भागात खनिज संपत्ती आहे.

खाली GSI चा सर्वेक्षण नकाशा आहे. हा नकाशा मणिपूरच्या जंगलात निकेल, तांबे आणि प्लॅटिनम गटातील धातूंची उपस्थिती दर्शवितो. कुकी आदिवासी मणिपूरच्या जंगलात राहतात. मणिपूरची 80% जमीन डोंगराळ आहे, म्हणजे कुकी.

भाजपने काय केले? त्यांनी डोंगरावर कब्जा करण्यासाठी मैदानी प्रदेशातील मैतींना एसटीचा दर्जा दिला. 4 मे रोजी, दंगल भडकवण्यासाठी एक बनावट व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या दिल्लीतील मुलीला मैतेयी महिला म्हणून खोटे चित्रित केले होते.

परिणामी, शेकडो मैती पुरुषांनी 2 कुकी महिलांना सार्वजनिकरित्या विवस्त्र केले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. विचार करा असे बनावट व्हिडीओ कोणत्या कारखान्यात बनवले जात असतील? अगदी बरोबर, जो विचार करत आहात तेच बरोबर आहे.

खरं तर, मणिपूरवर पंतप्रधान मोदींनी मौन बाळगण्याचा कारण हा आहे की त्यांनी राज्यातील पर्वत आपल्या मित्र कॉर्पोरेट्सना विकले आहेत.

होय. मणिपूर विकले गेले आहे, त्याच्या जमिनीवरील मौल्यवान खजिन्याचा लिलाव झाला आहे. कुकी आदिवासी असेपर्यंत पर्वत खोदणे कठीण आहे, म्हणून वांशिक नरसंहार सुरू आहे. मैतीने ते पर्वत काबीज करावे आणि कुकीला पळवून लावावे ही मोदी सरकारची युक्ती आहे. देश लुटला गेला आहे मित्रांनो कधीच, आता फक्त मृतदेहाची विटंबना सुरू आहे.

- सौमित्र राय

Recent Posts

See All

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page