महाड -व्हॅनसाठी आवाहन
- dileepbw
- Aug 4, 2021
- 1 min read
पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाडच्या पुनर्वसनासाठी काल दि.४ आॅगस्ट,२०२१ रोजी सोबत ५० युनिट रक्त(अमूल्य), एक रक्त संकलनाची व्हॅन(रू.३२ लाख) व महिनाभर पुरेल असे अन्य तपासणी साहित्य(Hepatitis B & C kits,HIV I & II kits, VDRL kits,Blood grouping sera,Plastic blood collection bags,Thermal Blood Sealer,Refrigerator इ.(सुमारे पाच लाख) घेऊन मदतीसाठी गेलो होतो.त्यावेळी आलेले अनुभव आज पासून क्रमाने सादर करतो.
कालची ही मदत म्हणजे तत्कालिक स्वरूपाची आपत्कालिन मदत असून ती यथावकाश जनकल्याण रक्तपेढी, पुणेला परत करायची आहे. महाडचे हे परप्रकाशी "चंद्रबळ" असून नजीकच्या भविष्य काळात जनकल्याण रक्तपेढी,महाडला स्वत:च्या पायावर पुन्हा उभे करायचे 'आहे. आपण "BJMC-1973" गटाने रक्तपेढीचे "पाय" व्हायचा निर्णय घेऊ या का ? त्यासाठी त्यांची वाहून गेलेली "रक्त संकलनाची व्हॅन" त्यांना देऊ या का ? येत्या रविवारी "मंडणगड" येथे रक्तदान शिबिर आयोजित करून जनकल्याण रक्तपेढी,महाड फिनिक्स पक्षाप्रमाणे "गरूडभरारी" घेत आहे.भले सध्या "पंख" जनकल्याण रक्तपेढी,पुणेने उसने दिलेली असतील.पण महाडला त्यांचे "पंख" आपण सर्वांनी मिळून देऊ या का ?
प्रत्येकाने फक्त रू.२००००/- ची देणगी पाठविल्यास हे सहज शक्य आहे.या गटात आपण १५३ आहोत. १५३x२००००=३०,६०००० होतात.कमी पडणारे रू.दीड लाख तर आपण आधीच जमा केलेले आहेत.मग आता वाट कसली पहाताय ! उठा ! जागे व्हा !
תגובות