माझे इतिहास संशोधन - महिलांचे सुवर्णप्रेम
- dileepbw
- Jul 31, 2021
- 2 min read
"माझे इतिहास संशोधन - महिलांचे सुवर्णप्रेम"
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
वाणी समाज बांधवांचे विशेषत: महिलांचे "सुवर्णप्रेम" जगद्विख्यात आहे.सोन्या बद्दल लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांना देखील अतीव प्रेम होते.आता पर्यंत मध्य आशियात खालील विविध ठिकाणी उत्खननात "सका/शक/Scythian" लोकांच्या सोन्याच्या हजारो वस्तू सापडलेल्या आहेत:-
१.Ulagan,Altay Republic, Novosibirsk
२.Tillya Tepe,Afghanistan ३.Belsk,Ukraine/Scythian capital Gelonus
४.Ryzhanovka,Ukraine
५.Kyzyl,Tuva,Siberia
६.Tolstaya Mogila,Pokrov, Ukraine
७.Granite kurgan stela, Romania
८.Kul-Oba,Crimea
९.Kostromskaya,Kuban
१०.Tápiószentmárton,
Hungary/National Museum of Hungary,Budapest
उत्खननात सापडलेल्या या वस्तूंचे जगातील सर्वात मोठे संग्रहालय Hermitage Museum, St Petersburg, Russia येथे उभारण्यात आले आहे.तर खालील ठिकाणी देखील या वस्तू पहायला मिळतात :-
उत्तम सका संग्रहालये :-
1.Hermitage Museum,
Budapest and Miskolc, Hungary
2.Museum of Historical Treasures of Ukraine
3.Institute of Archaeology in Kiev
4.State Historical Archaeological Preserve at Pereiaslav-Khmel'nyts'kyi
5.Hermitage Museum Kiev, Ukraine,Russia
6.Western European and American museums
7.National Museum of Afghanistan
Nikolai Veselovsky या रशियन पुरातत्वतशास्त्रज्ञाने "सका/शक/Scythian" राजांच्या व राण्यांच्या अनेक थडग्यांचे उत्खनन करून सोन्याचे हजारो दागिने (कानातले, गळ्यातले, मणी,माळा इ.) कंगवे, मुकूट,नाणी तसेच लोकरीच्या शाली,मातीची भांडी इ.गोष्टी शोधून काढल्या आहेत.त्यावर "सका/शक/Scythian" कलाकुसर ओतप्रोत भरलेली आहे.
ग्रीक इतिहासकार मध्य आशियातील सर्वच भटक्या जमातींना (Eurasian nomads -Massagetae, Sarmatians,Saka, Xiongnu/ Hsiung-nu) "Scythians" व त्यांच्या साम्राज्याला "Scythia" (Kazakhstan पासून ते थेट Georgia पर्यंत) असे म्हणत असत.या लोकांच्या कलेवर मुख्यत: चित्ते,सिंह,अस्वल, हरीण, रेनडियर या प्राण्यांचा प्रभाव आढळून येतो.
सका लोकांच्या स्थलांतराबरोबर त्यांच्या कलेवर शेजारच्या "पायझायरिक, ग्रीक,सर्माशियन,तगर, अल्डीबेल,ओर्डोस इ.संस्कृतींचा वेळोवेळी प्रभाव पडलेला आढळून आलेला आहे. त्यामुळे कलाक्षेत्रात "सका/शक/Scythian" लोकांची कला ही "संमिश्र कला" म्हणजे मध्य आशियातील सर्व संस्कृतीं (Scytho-Siberian world) पासून बनलेली "Steppes art" म्हणून ओळखली जाते.
सामान्य "सका/शक/Scythian" नागरिक दागिन्यांसाठी "सोन्या" ऐवजी "ब्राॅझ" या धातूचा वापर करीत असत. "ब्राॅझ" धातूच्या या दागिन्यांचा वापर घोडे,रथ,तंबू, चिलखत,शिरस्त्राण व कपडे सजविण्यासाठी केला जात असे.मृत व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी "ब्राँझ" धातूचे मानवी मुखवटे घडविले जात असत.सोने व ब्राँझ या बरोबरच लाकूड,चामडे,लोकर,हाडे,लोखंड व चांदी यांचा ही वापर केला जात असे.
ग्रीकांशी व्यापार करून सायथियन लोक श्रीमंत झाले व शेतीकडे वळाले.Belsk,Ukraine येथील उत्खननात सायथियन साम्राज्याची Gelonus ही राजधानी आढळून आली आहे.तर सायथियन साम्राज्याच्या पूर्वेकडील बर्फाळ प्रदेशात Pazyryk येथील उत्खननात गोठलेल्या अवस्थेतील अन्यथा नाशवंत असलेले लाकूड,कापड, कलाकुसर केलेले कपडे,लोकर,गोंदवलेले मृतदेह अशा अनेक गोष्टी सापडल्या आहेत.त्यामुळे त्या काळातील खरे व काल्पनिक प्राणी,सायथियन लोकांच्या देवता व राक्षस या बद्दलच्या संकल्पना, भौमितिक आकृत्या इ.गोष्टींची माहिती मिळते.
आता पर्यंत "सका/शक/Scythian" लोकांच्या सुवर्णा व्यतिरिक्त खालील महत्वाच्या वस्तू उत्खननात सापडलेल्या आहेत :-
१.घोड्यांची खोगीरे,रिकिबी,लगाम
२.चामडी पट्टे
३.कपडे लत्ते
४.चिलखते
धनुष्यपेटी/gorytus,बाण,भाते इ.




Comments