'माझे गडप्रेम - Skipton Castle, Skipton,UK
- dileepbw
- Sep 15, 2021
- 1 min read
लीड्स,इंग्लंड मधील चिरंजीव वैभव याच्या कडील दीड महिन्याच्या वास्तव्यात इंग्लंड व स्काॅटलंडमधील काही वैभवशाली किल्ले,महाल,राजवाडे इ.ऐतिहासिक वास्तू पहाण्याचा योग आला.त्यांची व्हिक्टोरियन व गाॅथिक शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना भारतातील किल्ल्यांपेक्षा फारच वेगळी आहे.आपल्या डी ब्लाॅक किंवा बर्न वाॅर्डची आठवण करून देणारी !
इ.स.१०९० साली Bolton Abbey चा सरदार Robert de Romille याने स्काॅटिश लोकांपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेला "Skipton Castle" हा किल्ला
पाठीशी Eller Beck हा कडा घेऊन उभा असल्याने संरक्षणाच्या दृष्टीने एक मजबूत किल्ला समजला जातो.या किल्ल्याच्या भिंतींचे बंदुकीच्या व तोफांच्या गोळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी मेंढ्यांची कातडी वापरली गेली होती हे ऐकून आश्चर्य वाटले.सहा मजबूत बुरूज असलेल्या या किल्ल्याला अतिशय भव्य असे नाॅर्मन पध्दतीचे प्रवेशद्वार आहे.
या किल्ल्याच्या बरोबर समोर स्कीप्टनचे सुप्रसिध्द फ्ली मार्केट भरते.सुनबाई आपल्या सासूबाईंना घेऊन तेथे शाॅपिंग करण्यात व्यस्त असल्याने मला संपूर्ण किल्ला मनसोक्तपणे पहाता आला.ब्रिटिशांच्या "हिशोबीपणा" चा एक अफलातून नमुना येथे पहायला मिळाला.बाह्य तटबंदीच्या भिंतीवरील प्रत्येक चिर्यावर तो कोरणार्याचे नाव लिहिलेले आढळले. का तर मजुरीचा हिशोब करायला सोपे जावे.कुठे बायकोच्या अंगावरचे दागिने विकून व घर गहाण ठेऊन रायगड बांधणारे "हिरोजी इंदुलकर" आणि कुठे हे ब्रिटिशर्स !
.




Comments