top of page

"माझे दलितायन - भाग ६"

  • dileepbw
  • Sep 14, 2022
  • 1 min read

"माझे दलितायन - भाग ६"

मुंबईला वंदन हेयर कटिंग सलून चालविणारे राम नगरकर हे नाभिक गृहस्थ भारतीय समाज व्यवस्थेतील "जातीची उतरंड" आपल्या "विच्छा माझी पुरी करा" या वगनाट्यातून व "रामनगरी" या एकपात्री प्रयोगातून अतिशय विनोदी पध्दतीने सादर करीत असत.थोडासा तसा प्रयत्न मी माझ्या

"माझे दलितायन" या लेखमालेतून करून पहातो.

आमच्या हाॅस्पिटल बॅचमधे एक "एकतर्फी" प्रेम साकारू लागले होते.दोघांच्या जाती वेगळ्या ! मग हे जुळवायचे तरी कसे ? "जातीची उतरंड" तेव्हा तर आजच्यापेक्षा जास्त कडक होती.मग आमच्या नुसत्याच प्रदीर्घ चर्चा चालायच्या.गाडी आंतरजातीय विवाह करावे की नाही ? या प्रश्नावर अडकायची.मग प्रत्येक जातीचे आचार,विचार, आहार,विहार यांचे विच्छेदन केले जायचे.काय श्रेष्ठ,काय कनिष्ठ याचा उहापोह व्हायचा.यावर कधी तरी एकमत होणे शक्य आहे का ? शेवटचा मार्ग म्हणजे मोजायला सोपा असा पैसा ! ज्या व्यवसायात जास्त पैसा तो मोठा ! पण "पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा" असे झाले तर ?

अशी अनेक उदाहरणे मी पाहिलेली आहेत.विवाह जुळविणे व सावरणे हे कार्य परमेश्वराने माझ्या मागे स्वखुशीने लावून दिलेले असावे.त्यामुळे आयुष्यभरात असे अनेक अनुभव घेता आले. आंतरजातीय विवाह टिकवणे हे तुलनेने अवघड असते,हे मात्र खरे !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page