top of page

माझ्या मनातलं गाणं

Aug 2, 2021
1 min read


माझ्या मनातलं गाणं मराठीतले दिग्गज कवी, गदिमांनी रचलेलं आहे. याला संगीत दिलंय, सुधीर फडके यांनी. त्यांनीच ते गायलं आहे.



किशोर पाटणकर



माझ्या मनातलं गाणं मराठीतले दिग्गज कवी, गदिमांनी रचलेलं आहे. याला संगीत दिलंय, सुधीर फडके यांनी. त्यांनीच ते गायलं आहे.



धुंद येथ मी स्वैर झोकितो


मद्याचे प्याले


याच वेळि तू असशिल


तेथे बाळा पाजविले


पुण्यात ओंकारेश्वर मंदीरापासून नदीकाठाने नव्या पुलाकडे जाताना वाटेत नेनेघाट गणेश मंडळ ही वास्तु आहे. तिथे लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला गणेशोत्सव आजही पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. याच ठिकाणी गणेशोत्सवात, १९५६-५७सालात बाबूजींनी पहिल्यांदा हे गाणं गायलं.


येथ विजेचे दिवे


फेकती उघड्यावर पाप


ज्योत पणतिची असेल


उजळित तव मुख निष्पाप


माझ्या कानी घुमती गाणी,


मादक मायावी


ओठांवरती असेल तुझिया


अमृतमय ओवी


बाबूजींनी दर्दभ‍‍ऱ्या आवाजात पहिली तान घेतल्यावर श्रोते शांत झाले. गदिमांच्या शब्दसामर्थ्याने सारेच चकित झाले होते. लोकांना ते खूपच आवडलं. कारण हे गाणं अतिशय अर्थपूर्ण होतं.



माझ्यावरती खिळली येथे


विषयाची दृष्टी


मत्पूजेस्तव असशिल


शोधित सखे, स्वप्नसृष्टी


कनकांगीच्या मत्त चुंबने


जाग मला आली


विरहाश्रू तव असेल झरला


सुकलेल्या गाली


तुझे नि माझे अंतर


व्हावे कसे एकरूप?


शीलवती तू, पतिव्रते


मी मूर्तिमंत पाप!




एका मद्यपी व्यक्तीच्या पोटात मद्याचे काही घोट गेल्यावर त्याचं भावविश्व जागं होतं. त्याला आपल्या प्रिय पत्नीची, बाळाची आठवण होते. या गाण्यातील भावना समजून तरी मद्यपी मद्यपानाबद्दल पश्चात्ताप करतील आण‌ि ते करण्याचं थांबवतील, अशी कवीची अपेक्षा आहे. हे गाणं मला खूप आवडतं. इतकंच नव्हे मी ते छान गुणगुणूही शकतो. त्यामुळेच हे माझ्या मनातलं गाणं आहे.



 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page