मा.भगवान
- Apr 12, 2023
- 3 min read
"Dr.Howard Tucker & Mr. Bhagwandada"
वयाचे शतक ओलांडूनही कार्यरत असलेल्या "Dr.Howard Tucker" या "American (Cleveland,Ohio) Neurologist" ची माहिती नसलीने प्रसृत करताच,मला आज सकाळी सकाळीच उदयने आठवण करून दिलेल्या "मास्टर भगवान" या हास्य अभिनेत्यावर लिहावेसे वाटले.
वयाची शंभरी गाठलेले Dr.Howard Tucker अजूनही निवृत्त व्हायलाच तयार नाहीत.त्यांची psychoanalysis व psychiatry पदवीधर पत्नी "सारा" पण तशीच ! वय ६५ ! पण अजून रूग्ण तपासते."थांबला तो संपला" हे दोघांचे मत ! जो थांबेल त्याचा cognitive decline हा होणारच !
आवडीचे चित्रपट पहात पहात "नियमित व्यायाम" ही "Dr.Howard Tucker" यांच्या आरोग्याची गुरूकिल्ली ! व्यसनांपासून लांब ! धूम्रपान नाही ! मद्यपान नियमीत पण मर्यादीत ! आहारात भरपूर पालेभाज्या ! सदोदीत ज्ञानदानात तसेच आत्मचरित्र लिहिण्यात व्यस्त ! असा हा वयाच्या ६० व्या वर्षी "वकिली" शिकलेला हा "चिरणतरूण" ! त्यांच्या प्रमाणेच आपण सुध्दा जगायला शिकायला हवे.मा.भगवान दादा यांचे आयुष्य पण असेच प्रेरणदायी ! जरूर वाचा.
मा.भगवान दादा यांच्या स्टेपवर एकदाही नाचला नाही असा एकही मराठी माणूस नाही.अमिताभ, गोविंदा,ऋषि कपूर,मिथुन हे सगळेच त्यांच्या स्टेपवर नाचतात तर ! आठवते ना ? "बाॅंबे टू गोवा" सिनेमाच्या निमित्ताने अमिताभ मा.भगवान दादा यांच्या "सिग्नेचर डांस स्टेप" कसा नाचला ते !
शोला जो भड़के,
दिल मेरा धड़के
दर्द जवानी का सताए
बढ़ बढ़ के..
१९५१ सालच्या "अलबेला" मधल्या या गाण्यावर सगळी दुनिया थिरकली होती,आजही थिरकत आहे व पुढे देखील थिरकणार आहे.आज देखील लालूभाई मेंशन,दादर,मुंबई या त्यांच्या निवासस्थानाजवळ गणेश विसर्जनाची मिरवणूक आली रे आली की हे गाणे सुरू होते व लोक आनंदाने वेडे होऊन मा.भगवान दादा यांच्या "सिग्नेचर डांस स्टेप" करीत नाचू लागतात.
कुस्तीची आवड असलेल्या मा.भगवान दादांनी पडद्यावर अनेक "स्टंट" केले.अशाच एका स्टंटमधे त्यांनी ललिता पवारला "फाईट" मारून कायमची "चकणी" बनवले.पण याच "चकणेपणा" मुळे पुढे
ललिता पवार खूप भाव खाऊन जायच्या.हिरोने पडद्यावर नाचण्याची प्रथा सुध्दा मा.भगवान दादांनीच सुरू केला."भेडी बंगला" हा पहिला हिंदी भयपट त्यांनीच १९४९ साली निर्माण केला. त्यामुळे व्ही.शांताराम खूपच प्रभावित झाले होते.
१९७५ ते १९८२ या आपल्या वैद्यकीय शिक्षणाच्या कारकिर्दीत मा.भगवान दादांनी अनेक चित्रपटांमधून "हवालदार पांडू" साकारल्याचे आठवते ना ? जवळ जवळ ३०० चित्रपट त्यांच्या खात्यावर जमा आहेत.
माझे शालेल शिक्षण ज्या "अमरावती" शहरात झाले त्याच शहरात एका सिंधी कापड गिरणी कामगाराच्या गरीब कुटूंबात मा.भगवान दादांचा जन्म झाला.त्यांचे संपूर्ण नाव श्री.भगवान अभाजी पालव ! त्यांचे बालपण परळला गिरणी कामगारांच्या चाळीत गेले.चौथीत असतानाचा शाळा सोडावी लागली.१९३१ साली "मूकपट" मधे भूमिका साकारत त्यांनी १९९६ पर्यंत म्हणजे "Dr.Howard Tucker" प्रमाणेच वयाच्या ६५ वयापर्यंत अभिनेता,निर्देशक,लेखक,निर्माता म्हणून काम केले.
मा.भगवान दादांचे राज कपूर यांच्याशी मित्रत्वाचे संबंध होते.त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी "अलबेला" हा चित्रपट बनवला.त्यावर्षी भारत व आफ्रिका येथील बाॅक्स ऑफिसवर राज कपूरचा "आवारा" प्रथम,गुरूदत्तचा "बाज़ी" द्वितीय
तर मा.भगवान दादांचा "अलबेला" तृतीय क्रमांकावर "हीट" ठरला होता.त्यामुळे दादांनी
"झमेला" व "लाबेला" अशा अजून दोन फिल्मस् बनवल्या.पण त्या आर्थिक दृष्ट्या यशस्वी ठरल्या नाहीत.त्यांच्या "हंसते रहना" या सिनेमाने तर त्यांना अक्षरश: रडवले.या सिनेमाचा नायक "किशोर कुमार" याने त्यांना रसातळाला नेले.त्यांना आपला जूहूचा २५ खोल्यांचा बंगला,सात गाड्या आशा स्टूडियो व बायकोचे दागिने विकावे लागले व शेवटी दादरला एका चाळीत रहायला जावे लागेल.
तक्षशीला विद्यापीठाप्रमाणेच भगवान दादांचे १९४० पूर्वीचे सर्व सिनेमे गोरेगावच्या आगीत भस्मसात झाले आहेत व मा.भगवान दादा नावाच्या विद्यापीठाची अपरिमित हानी झाली आहे.या विद्यापीठाने संगीतकार सी.रामचंद्र, गीतकार आनंद बक्षी व राजिंदर कृष्ण,गायक हेमंत कुमार,अभिनेते ओम प्रकाश असे "दिग्गज" तसेच "चंद्रू" नावाचा अभिनेता हत्ती(१९४१ सालची तमिल फिल्म "वना मोहिनी") यांना घडवले.
Dr.Howard Tucker हे मार्टिनीचे शौकिन ! पण रोज फक्त दोन पेग ! मा.भगवान दादांचा षौक अतिरेकी ! त्यांनी पिऊन रिकाम्या केलेल्या बाटल्या
विकल्या तरी देखील एक "बंगला" आला असता. दारूच्या या व्यसनानेच दादांचा घात केला.असे असूनही तत्कालिन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता.
मा.भगवान दादा "Dr.Howard Tucker" यांच्या इतकेच व्यस्त होते.त्यामुळे त्यांनी शूटिंगच्या वेळीच उभ्या उभ्या झोप काढायची सवय लावून घेतली होती.अशा या व्यस्त कलाकाराने भारत-पाक फाळणीच्या वेळी अनेक मुसलमान सिनेकलाकारांना आश्रय दिला होता.हे ही लक्षात घ्यायला हवे.
अशा या व्यस्त कलाकाराच्या जीवनावर "एक अलबेला" नावाने एक मराठी चरित्रपट निर्माण झाला असून तो सर्वांनीच पहायला हवा.यात गीता बालीची भूमिका विद्या बालनने साकारली असून दादांची भूमिका मराठी अभिनेता मंगेश देसाईंनी साकारली आहे.ही भूमिका विद्या बालनने का बरे स्विकारली असावी ?
Comments