top of page

माझे कुलग्राम - पिलखोड

  • dileepbw
  • Sep 8, 2022
  • 1 min read

"पिलखोड" हे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव व शिरोडे" या कुलाच्या समाजबांधवांचे "कुलग्राम" आहे.

लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाची सांस्कृतिक राजधानी "धुळे" या शहरापासून फक्त ४४ कि.मी.अंतरावर,जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात वसलेले "देव व शिरोडे" कुलबांधवांचे "पिलखोड" हे गाव अजूनही "मोठे खेडे" म्हणावे एवढेच प्रगत झालेले आहे. जेमतेम १०७५ कुटुंबांचे वास्तव्य असलेलल्या या मोठ्या खेड्यात फक्त ५२२२(२७२९ पुरुष व २४९१ स्त्रिया) लोक राहतात.

ज्यांना आधुनिक शिक्षण घेणे गरजेचे आहे अशी बाल-गोपाल मंडळी एकूण लोकसंख्येच्या १४.४१% असून "पिलखोड" या मोठ्या खेड्याची साक्षरता(७७.%), महाराष्ट्राच्या साक्षरतेच्या प्रमाणापेक्षा(८२.३४%) बरीच खाली आहे हे येथे लक्षात घेतले पाहिजे. "पिलखोड" या मोठ्या खेड्यातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण(६८.५९%) मुलांच्या शिक्षणाच्या प्रमाणापेक्षा(८६.१८%) खूपच खाली आहे हे सुद्धा ध्यानात ठेवले पाहिजे.

"पिलखोड" या मोठ्या खेड्यात आज जे.एन.इ.,टोडलर अकादेमी,पुष्कर निकुंब,संजय भालेराव अशा शाळा व शेजारील चाळीसगाव शहरात अे.बी.हायस्कूल सारख्या शैक्षणिक संस्था, "पिलखोड" मधील साक्षरतेचे कमी असलेले हे प्रमाण वाढवण्यासाठी कौतुकास्पद काम करीत आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)

भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६

Recent Posts

See All
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 
देवांचे देव

"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुल(Clan) भारतीय धर्मशास्त्रातील काही "देव" निसर्गामधील विविध शक्ती...

 
 
 

Comentários

Avaliado com 0 de 5 estrelas.
Ainda sem avaliações

Adicione uma avaliação
bottom of page