top of page

मासाहार ते शाकाहार

  • dileepbw
  • Nov 23, 2022
  • 2 min read

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.

मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्‍या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)

इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

भारतात स्थलांतरित होण्यापूर्वी लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज कंदमुळे व शिकार केलेल्या प्राण्यांचे मास खाऊन जगत असत.त्यामुळे देवतांना नैवेद्य म्हणून "प्राण्याचा बळी" देण्याची प्रथा "सका/शक/Scythian" लोकांमध्ये रूढ होती.सका लोक सर्व प्रकारच्या प्राण्यांचा विशेषत: "हरीण/काळवीट(सांबार)" याचा बळी देत असत.श्रीमंत व्यक्ती/टोळी प्रमुख मात्र घोड्याचा बळी देत असत.कारण ते मोठे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात असे.पण रानडुकराचा किंवा वराहाचा बळी देणे तसेच त्याचे पालन करणे हे मात्र निषिध्द होते.प्राण्याचा बळी देताना त्याचे पुढचे दोन पाय बांधून त्याच्या गळ्यात फास टाकून व त्यात अडकविलेली काठी गोल गोल फिरवून त्या प्राण्याचा गळा घोटला जात असे.त्यानंतर त्याची चामडी सोलून त्याचे मास शिजवून "कुमीस" या घोडीच्या आंबवलेल्या दूधापासून बनविलेल्या मद्याबरोबर प्रसाद म्हणून वाटले जात असे.या प्रथेमुळे इ.स.पूर्व सहाव्या शतकातील सका लोकांच्या थडग्यांवरील शिलालेखांवर मुख्यत: मृतव्यक्ती उजव्या हाताने "कुमीस" हे पेयपान करीत असल्याचे चित्र कोरलेले आढळते.सर्व सामान्य सका व्यक्तीला बळी देण्यासाठी हरीण/काळवीट(सांबार)" हा प्राणी परवडत असावा. त्यामुळे बर्‍याच शिलालेखांवर त्याचे चित्र कोरलेले आढळते.

(Herodotus)

"सका/शक/Scythian" लोक जसे शिकार करायचे सोडून शेतीकडे वळाले तसे प्राण्यांच्या बळीची जागा शाकाहारी नैवेद्याने घेतली.लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे खास वैशिष्ट्य असलेली "खापरावरची पुरणपोळी(मांडा)" हे त्याचेच उदाहरण आहे.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comentários

Avaliado com 0 de 5 estrelas.
Ainda sem avaliações

Adicione uma avaliação
bottom of page