युझी(Yuezhi) लोकांकडून पराभव
- dileepbw
- Sep 12, 2022
- 2 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाचे मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात,अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणारे,इराणी मूळ असलेले "सका/शक/Scythian" वशांचे पूर्वज इतिहासात "Kindred Scythians/Eastern Scythians) म्हणून ओळखले जातात. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - ग्रीक इतिहासकार Herodotus).
चीनच्या प्राचीन इतिहासात तराई खोर्यात,पामीर पर्वता जवळ वास्तव्याला असलेल्या इराणी मूळ असलेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" पूर्वजांचा उल्लेख "साॅगडियन्स व खोतानीज् (Sogdians and Khotanese)"असा केलेला आढळतो.त्यांची संस्कृती झमन बाबा संस्कृती (Zaman-Baba culture) म्हणून ओळखली जात असे.ते मध्य आशियात अल्फाअल्फा ही वनस्पती,द्राक्षे,बकर्या,मेंढ्या,घोडे,वाद्ये यांचा व्यापार करीत असत.या व्यापारावर ताबा मिळविण्यासाठी "सका/शक/Scythian" लोकांच्या अधिपत्याखालील Gan-su हा प्रांत जिंकणे चिनी लोकांसाठी आवश्यक होते.त्यासाठी झालेल्या चिनी आक्रमणांमुळे "सका/शक/Scythian" लोकांना भारतात स्थलांतरीत व्हावे लागले.
इ.स.च्या दुसर्या शतकात चीनमधून आलेल्या Yuezhi
लोकांनी "सका/शक/Scythian" लोकांना आधी Sogdia व Bactria व त्यानंतर वायव्य भारतात हुसकावून लावले.या वायव्य भारतातील "सका/शक/Scythian" लोकांना इतिहासात Indo-Scythians असे म्हणतात.
काही "सका/शक/Scythian" लोक भारताऐवजी
पश्चिमेकडील "पार्थिया" या देशात स्थलांतरीत झाले.तेथे त्यांनी Sistan ही आपली राजथानी स्थापन केली.
काही "सका/शक/Scythian" लोकांनी भारत व पार्थिया ऐवजी चीनच्या युनान प्रांतातील Dian साम्राज्यात जाणे पसंत केले.तेथे त्यांनी तराई खोर्यातील तकलामाकन वाळवंटातील Khotan, Yarkand,Kashgar इ.प्रांतात स्थलांतर केले.
सका/शक/Scythian" लोकांच्या या तीन ठिकाणच्या स्थलांतरामुळे लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या या पूर्वजांचा इतिहास समजावून घ्यायचा असेल तर चीन,पार्थिया व वायव्य भारताचा इतिहास समजावून घ्यावा लागेल.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता, कुलाचार,कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)
コメント