"राग भूप - उड़े जब-जब जुल्फें तेरी"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 3 min read
"राग भूप - उड़े जब-जब जुल्फें तेरी"
©दिलीप वाणी,पुणे
उदयने १९५७ सालच्या "नया दौर" या सिनेमातील दिलीप कुमार व वैजयंतीमाला यांच्यावर चित्रीत झालेले "हो उड़े जब जब जुल्फें तेरी" हे सदाबहार गीत ऐकवून एकच बहार आणली.साहिर लुधियानवी यांनी रचलेले हे गीत ओ.पी.नय्यर यांनी "राग भूप" मधे स्वरबध्द केलेले आहे व रफी आशा यांच्याकडून गाऊन घेतले आहे.
"नया दौर" हा सिनेमा नेहरूवादी आर्थिक नीतीवर भाष्य करणारा चित्रपट होता.धर्मनिरपेक्षता, समाजवाद व राष्ट्र-निर्माण याचे पुरस्कर्ते असलेल्या बी.आर.चोप्रा यांनी गावचा टांगेवाला व ठेकेदार यांच्यातील 'संघर्ष" फार छान मांडला आहे. "ऑटोमेशन व मशीनीकरण" च्या आजच्या काळात या "नया दौर" या सिनेमाचे महत्व अधिकच अधोरेखीत होते.आमिर खानने हे महत्व अचूक ओळखले व आपली "फिल्म लगान" बनविली. म.गांधींचा "मानवी श्रम" श्रेष्ठ मानणारा विचार व पंडीतजींचा "ऑटोमेशन व मशीनीकरण" श्रेष्ठ मानणारे विचार यातील संघर्ष म्हणजे "नया दौर" !
२००७ साली या कृष्ण-धवल सिनेमाने "रंगीत अवतार" धारण केला.दुर्दैवाने त्याला मात्र व्यावसायिक सफलता मिळाली नाही.
"राग भूप" मधे स्वरबध्द केलेल्या "हो उड़े जब जब जुल्फें तेरी" हे सदाबहार गीताने "फिल्मफेयर पुरस्कार" प्राप्त केला.ऐका हे गीत !
हो उड़े जब जब जुल्फें तेरी
हो उड़े जब जब जुल्फें तेरी हो ओह
उड़े जब जब जुल्फें तेरी
हो उड़े जब जब जुल्फें तेरी
कवारियों का दिल मचले
कवारियों का दिल मचले जींद मेरिये
ओह जब ऐसे चिकने चेहरे
ओह जब ऐसे चिकने चेहरे
तो कैसे ना नजर फिसले
तो कैसे ना नजर फिसले जींद मेरिये
हो रुत प्यार करन की आई
रुत प्यार करन की आई हो ओह
रुत प्यार करन की आई
हो रुत प्यार करन की आई
के बेरियों के बेर पक गये
के बेरियों के बेर पक गये जींद मेरिये
कभी डाल इधर भी फेरा
कभी डाल इधर भी फेरा
के तक तक नैन थक गये
के तक तक नैन थक गए जींद मेरिये
हो उस गाँव पे स्वर्ग भी सदके
हो उस गाँव पे स्वर्ग भी सदके हो ओह
हो उस गाँव पे स्वर्ग भी सदके
हो उस गाँव पे स्वर्ग भी सदके
के जहां मेरा यार बस्ता
के जहां मेरा यार बस्ता जींद मेरिये
पानी लेने के बहाने आजा
पानी लेने के बहाने आजा
के तेरा मेरा इक रास्ता
के तेरा मेरा इक रास्ता जींद मेरिये
हो तुझे चाँद के बहाने देखु
हो तुझे चाँद के बहाने देखु हो ओ हो ओ
तुझे चाँद के बहाने देखु
हो तुझे चाँद के बहाने देखु
तू छत पर आजा गोरिये
तू छत पर आजा गोरिये जींद मेरिये
अभी छेड़ेंगे गली के सब लड़के
हो अभी छेड़ेंगे गली के सब लड़के
के चाँद बैरी छिप जाने दे
के चाँद बैरी छिप जाने दे जींद मेरिये
हो तेरी चाल है नागिन जैसी
हो तेरी चाल है नागिन जैसी हो ओ हो ओ
तेरी चाल है नागिन जैसी
हो तेरी चाल है नागिन जैसी
रे जोगी तुझे ले जाएंगे
रे जोगी तुझे ले जायेंगे जींद मेरिये
जाए कही भी मगर हम सजना
हो जाए कही भी मगर हम सजना
यह दिल तुझे दे जायेंगे
यह दिल तुझे दे जायेंगे जींद मेरिये
या हिंदी गीताने "तमिल" सिनेमात देखील चांगलाच धुमाकूळ घातला. "तमिल" गीताला देखील ओपी नय्यर यांनीच संगीतबध्द केले होते.गीतकार होते "कंबदासन" ! तर पार्श्व गायक होते "सीरकाज़ी गोविंदराजन,पी.सुशीला व टीवी रत्नम ।
आता "राग भूप" या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील रागाबद्दल दोन शब्द !
थाट -कल्याण
प्रकार- हिंदुस्तानी
जाती- औडव-औडव
स्वर- मध्यम व निषाद वर्ज्य
आरोह - सा रे ग प ध साअवरोहसा ध प ग रे
सावादी स्वर - गंधार
संवादी स्वर - धैवत
पकड - साऽऽ, ध़ऽ ध़ऽ सा, सारेग पऽ धऽऽ पऽ ग, रे ग सा रे, ग सागायन
समय - रात्रीचा पहिला प्रहर,
समप्रकृतिक राग - राग देसकार
इतर वैशिष्ट्ये -
हा राग कल्याण थाटाचा राग आहे. या रागामध्ये ‘मध्यम‘ व ‘निषाद‘ हे दोन स्वर वर्ज्य असल्यामुळे या रागाची जाती औडव- औडव अशी होते. या रागाचा वादी स्वर ‘गंधार‘ असून संवादी स्वर ‘धैवत‘ आहे. हा राग रात्रीच्या पहिल्या प्रहरात गातात. या रागाला समप्रकृती असा देसकार हा राग आहे. हा भक्तिरसप्रधान राग आहे.
Comments