top of page

रावबहादुर ठुबे,कान्हुर

  • dileepbw
  • Aug 3, 2021
  • 1 min read

"रावबहादुर ठुबे,कान्हुर"


राधाकृष्ण ठुबेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना आगरकरला शिवाजीनगर येथील "ठुबे पार्क" ची आठवण झाली तर मला रावबहादुर ठुबे,कान्हुर यांच्या तळजाई टेकडी वरील बंगल्याची !


ब्रिटिशांनी "रावबहादुर" ही पदवी दिलेले रावबहादुर ठुबे हे पेशवेकालीन सावकार ! शिवपूर्वकाळात कासारी, कुंभारी आणि पुनवडी या वस्त्यांतून "कसबे पुणे" आकाराला आले. मुळा-मुठा नदीकाठी "झांबरे पाटील" यांचे वाडे होते आणि पाटलांच्या चावडीवर गावचे न्यायनिवाडे होत असत. गावगाड्याची ही प्रथा अनेक वर्षे रूढ होती. पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या उत्सवात झांबरे पाटलांचा मान असे. स्वराज्याचे संकल्पक महाराज शहाजीराजे यांच्या जहागिरीचे पुणे हे गाव होय.तेव्हापासून

रावबहादुर ठुबे येथे सावकारी करीत असत.त्यांच्या कान्हुर या गावी देखील त्यांची मालमत्ता अजून ही आहे.


तळजाई टेकडी वरील रावबहादुर ठुबे यांचा बंगला निर्मनुष्य असल्याने तो "भूत बंगला" म्हणून औळखला जातो.त्याच्या बद्दल अनेक सुरस कथा ऐकायला मिळतात.

इ.स.१९०० साली रावबहादुर ठुबे यांनी हा वाडा खरेदी केला व रंगेल प्रवृत्तीच्या रावबहादुरांनी तेथे धडाधड "संगीत व रंगीत मेजवान्या" आयोजित करण्याचा सपाटा सुरू केली.अशाचा एका मेजवानीत मद्याच्या नशेत त्यांच्या हातून एका नर्तिकेचा खून झाला.तिच्या "पैजंणांची छुमछुम व किंकाळ्या" व "रावबहादुरांची छाया" आज ही तेथे पाहिल्याचे काही जण सांगतात.त्यामुळे रात्री तिथे कोणी फिरकत नसले तरी दिवसा तेथे पर्यटकांची गर्दी असते.








 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page