लाख मोलाचा रूपया
- Aug 2, 2021
- 1 min read
"लाख मोलाचा रूपया"
आज दिवसाची सुरूवात चांगली झाली."काळरात्र" संपून
"आशेचा किरण" दिसू लागला.अशोक जाधवने पाठविलेला "लाख मोलाचा रूपया" भरून पावला.या "एक रूपया" ने मनोबल वाढविले.सर्वजण सोबत आहेत हे पाहून पुढची लढाई लढण्यास धैर्य प्राप्त झाले.त्याने पेटवलेली ही "ज्योत" आज प्रत्येकाच्या मनात तेवो व जनकल्याण रक्तपेढी,महाडला या आपद्कालीन परिस्थितीत "फिनिक्स" पक्षाप्रमाणे पुन्हा "गरूड भरारी" घेण्यास आर्थिक बळ प्राप्त करून देवो.हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
आज मी माझा "खारीचा वाटा" म्हणून रू.एक लाखाची मदत पाठवित आहे.आपण देखील आजच आपला "खारीचा वाटा" उचलावा व या जनता जनार्दनाच्या रथाला आपला मोलाचा हातभार लावावा.हे विनम्र आवाहन !
Comments