लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "कुलग्रामे"
- dileepbw
- Sep 7, 2022
- 1 min read
सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व "पुरोहित" मंडळींकडून मिळालेली लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "कुलग्रामां" ची यादी खाली देत आहे.
त्याचा व इंटरनेटचा सदुपयोग करून किमान आपल्या "कुला" चा इतिहास लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांनी, किमान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांनी, शोधून काढावा ही नम्र विनंती.
ही "कुलग्रामां" ची यादी देणाऱ्या पुरोहितांना(माननीय श्री. कमलाकर पुरुषोत्तम आगाशे, श्री. नंदकुमार विनायक शुक्ल, श्री. रामदास गंगाधर गायधनी, श्री. सोमनाथ बेळे व श्री. प्रभाकर बेळे) मनःपूर्वक धन्यवाद !
"लाड सका(शाखीय) वाणी समाजाची कुलग्रामे"
पिलखोड - देव, शिरोडे
हातले - मोराणकर
आर्वी - केले
शिरूड - टिपरे, पितृभक्त, चितोडकर
सावळे निशाने - बागड
जामधरी - सोनजे
दहीवड - नानकर, सोनजे
चाळीसगाव - शिनकर
रांजणगाव - धामणे, येवले
गोंदेगाव - पाखले
भडगाव - कोतकर
खरजाई - समस्त वाणी समाज
पिंप्री हवेली/पिंप्री चाळीसगाव - शिनकर, भामरे
पारोळा - शेंडे
देवळी - मोराणकर, येवले
वोढरे - वाणी
मेहुणबारे - येवले, अमृतकार
कुरंगी - देव
खेडले - मोराणकर
उंदीरखेड - येवले
हुंबड नांद्रे - खैरनार, बोरसे
सोनगीर - देशमुख, राणेपाणे, डेरे
एरंडोल - काळमांडे
धरणगाव - कुडे
ढाडरे - गोल्हार
वारुड पाष्टे - कोतकर
निजामपूर - बधाणे, कोतकर, येवले
गाळणे - बाविसकर
बहादरपूर - अमृतकार
आडगाव चिंचखेड - मुसळे, अमृतकार
बुरझड - अमृतकार
रांजणगाव आर्वी - बागड, पाटकर
शिरवाडी - कोठावदे
कुसुंबे - ब्रह्मे, ब्राह्मणकार
कजगाव - अमृतकार
लोहटार - मालपुरे
तरखेडे - पाटे, अमृतकार
कासोदे - चिंचोरे
गोंदेगाव - महालपुरे, येवले
बहाळ - शिनकर, पिंगळे
आडगाव,एरंडोल - अमृतकार
सामनेर - सोनकुळे
सोनगीर - देशमुख
पारोळा - नावरकर, अमृतकार
गोंडगाव - मालप�
Comentários