वाणी विवाह संस्कृती
- dileepbw
- Nov 11, 2021
- 1 min read
"माझे इतिहास संशोधन - वाणी विवाह संस्कृती"
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पासून प्रेरणा घेऊन सुरू केलेल्या माझ्या "सका/शक/Scythian" लोकांच्या संशोधनातून त्यांच्या विविध प्रथांवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.त्यातीलच "विवाह संस्कार" ही एक प्रथा ! माझ्या चिरंजीवांच्या लग्नात मंगलाष्टके सुरू असताना माझ्या विहीणबाई मांडवातच एका तुळशीच्या रोपावर पाण्याची "संतत धार" धरून उभ्या होत्या. या प्रथेचा इतिहास शोधण्यासाठी माझा अभ्यास सुरू झाला व खालील माहिती मिळाली.
हिंदू धर्मातील "वैष्णव" पंथीय लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील विविध प्रथांचा उगम शोधताना "तुळशी विवाह" या प्रथेबद्दल खालील माहिती मिळाली.
"भू" मातेचे "दायूस" या देवतेशी दरवर्षी लग्न लावून दिल्यास तिची उप्तादन क्षमता(कस) वाढेल या संकल्पनेमुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "तुळशी विवाह" ही प्रथा सुरु झाली असावी असे वैज्ञानिकांना वाटते.
अशीच प्रथा बंगाल प्रांतात देखील पाळली जाते.
( संदर्भ:- Bhrha-Bilrhl Marriage Ceremony - Wise, 132 f. ; Kisley, op. cit. i. 270, 381, li. 203).
मिर्झापूर येथील "मंझवार(मांझी)" जमातीत देखील अशीच "दिली-देवहारीन" यांचा विवाह लावून देण्याची प्रथा आढळून येते.
(संदर्भ :- Crooke, Tribes and Castes, iii. 435, 447).
मध्य भारतातील "खरवार" या जमातीमध्ये "चंडोल-चंद्र" किंवा "मुंडा" या जमातीमध्ये "देसौल-झरेरा/मातुरू" तसेच पलामू येथे "दरहार-डाकिन" यांचा विवाह लावून देण्याची प्रथा आहे.
(संदर्भ :- Dalton, 130, 188 ; Frazer, GB^ ii. 154 ff. and Gansam,NINQ i. 40).
या संदर्भांवरून ही प्रथा "पुनरूत्पादना" शी निगडीत असावी असे वाटते.




Comments