वैभवचा वाढदिवस
- dileepbw
- Feb 6, 2022
- 1 min read
आज दि.७ फेब्रुवारी हा माझा चिरंजीव वैभव याचा वाढदिवस ! त्याला सर्वांतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
वैभवचे बहुतेक वाढदिवस त्याच्या आजीने व आईनेच साजरे केले.कारण त्याच्या बालपणात मी जनकल्याण रक्तपेढी व मेडीकेअर पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरीच्या कार्यात कायम व्यस्त असे. तो आनंद आता माझ्या "दुधावरची साय" असलेला नातू "अयांश" याच्या वाढदिवसातून मिळवतो आहे.
"दुधावरची साय"
दूधावरची साय आवडे सार्यांना!
स्निग्धता असे तिच्या अंगी!
जास्त खाता वाढे चरबी!
लावता त्वचेला तेज चढे अंगी!
दूधावरची साय त्यात हळद!
करुनी एकजीव लावा चेहर्याला!
मुलायम होई त्वचा सायीने!
उजळे तेजी हसत मुखाला!
दूधावरच्या सायीत असते लोणी!
दूध विरजता बनते दही!
पाणी टाकूनी घुसळावे ताक!
त्यातून निघे साजूक तूप सई!
नातवंडांवर आजीची माया!
मुलांमुलींनपेक्षा जास्तच!
संसाराचं सुख त्यातच असतं!
शोभे दुधावची साय मस्तचं!
सेवा करावी गोमातेची!
हिरवागार चारा गायिला!
दूध देई बालकाला!
जपावे दूधावरच्या सायीला!
चहा करतांना टाकावी दूधसाय!
लागे चहा लज्जतदार!
ऊर्जा मिळे शरीराला!
सायीचे दूध असे चवदार!
थंडीत ओठ उलतात बाई!
लावू दूधावरचीसाय तयांना!
येई ओठांना मऊपणा!
सायीचा गुणधर्म जाणा!
दूधापेक्षा जपावे सायीला!
नातनातू आवडे आजीला!
गप्पागोष्टीत मन रमवी!
नातवंड येती आजीच्या मदतीला!
साय काढूनी दूध प्यावे!
दुधाची साय वाढवी कफ!
रुतूप्रमाणे जपावे प्रकृतीस!
उन्हाळ्यात प्यावे ताक!
दूध तापवावे लक्ष ठेवून!
ऊतू जावू देवू नाही!
जीवतृप्त दुधावरची साय खावून!
लेकरांना माय खाण्या देई!
दुधा पेक्षा दुधावरची सायच जास्त प्रिय ! नाही का ?




Comments