वैदिक संस्कृत
- dileepbw
- Sep 29, 2022
- 2 min read
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांच्या इतिहासावर प्रकाश टाकू शकेल अशी जागतिक चर्चा Quora.com या संकेतस्थळावर सुरू असून त्याचा गोषवारा समस्त लाड सका(शाखीय) वाणी समाज बांधवांच्या माहितीसाठी या अभ्यासगटात क्रमश: प्रसृत करीत आहे.
१.प्राचीन संस्कृत भाषेत विसर्ग(:) उच्चारताना "अह" असा उच्चार करावा लागेल."ह" चा जोरात("Ah" with an exploding sound) उच्चार करावा लागत नसे.पण वैदिक संस्कृत भाषेत तो तसाच करावा लागतो.तर प्राकृत भाषेत "ह" चा उच्चारच करावा लागत नाही.
२.इ.स.पू.४०० साली गांधार देशातील पाणिनी या विद्वानाने "अष्टाध्यायी" या ग्रंथात "प्राचीन" संस्कृत भाषेच्या व्याकरणात सुधारणा करून "वैदिक" संस्कृत भाषा सुरू केली.
३."वैदिक" संस्कृत भाषा ही "देवांची भाषा" व प्राकृत तसेच अन्य स्थानिक भाषा या "अपभ्रंश" भाषा म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
४.तमिळ भाषा ही भगवान शंकराने निर्माण केली असे तमिळ लोक मानतात.Shaivism is donated directly by the Dravidians to the whole of Indian culture.
"The original Indians were Adivasis related to the Australian Aborigines and Negritos, and they spoke Proto-Australian and Indo-Pacific languages".
Altaic Margianese संस्कृतीच्या "सका/शक/Scythian" लोकांची "सोम(Soma/Haoma)रस प्राशन" ही संकल्पना वैदिक धर्मात समाविष्ट झाली असे काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
५.The name “Dravida” means “in the midst of the waters,” which accurately describes the Dravidians’ situation in South India today.
६.It is also extremely important to state that all Indians are descended from migrants from somewhere else, no humans appeared magically from the soil of India. Everybody in the entire world is a migrant, except for the people of southwest Ethiopia. Because that’s where the entire human race actually began in 200,000 BC.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)




Comments