विवाहजुळणीची समस्या
- dileepbw
- Sep 9, 2022
- 1 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे "व्यापार व सावकारी" !
तर "उच्च शेती,मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी" ही पारंपारिक म्हण !
लाड सका(शाखीय) वाणी समाजामध्ये विशेषत: लग्नाळू मुलींच्या मनामध्ये हा विचार पूनरूज्जिवीत करण्यासाठी
"माझा पती उद्योग पती" या लघुपटाची निर्मिती करण्यात येत आहे.
कल्पना छान आहे. सर्व समाज बांधवांनी एकत्र येवून या विषयावर चर्चा केली पाहिजे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील सद्य वैवाहिक समस्या लक्षात घेता, प्रत्येक मुलीच्या वडीलांनी आपलाही मुलगा लग्नाचा आहे असा विचार करायला हवा.
आजच्या काळात देखील नोकरी पेक्षा धंदा बरा हे अजूनही सिद्ध करावे लागते याचेच वाईट वाटते.
ही कल्पना समाजातील ज्या होतकरू तरुणांना सुचली आणि त्यांनी आपले विचार मांडले त्यांना त्यांच्या या कार्यात मन:पूर्वक शुभेच्छा !
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ८८२४)
コメント