"शिल्पकार बी.आर.खेडकर - भाग १"
- dileepbw
- Feb 18, 2023
- 1 min read
"शिल्पकार बी.आर.खेडकर - भाग १"
मी "गालिब" चे "शेर" ऐकवताच सुरेश भोईटेने पण एक शेर ऐकवला !
वाणी और पानी दोनों में ही छवि नजर आती है ! पानी स्वच्छ हो तो 'चित्र' नजर आता है,
'वाणी' मधुर हो तो 'चरित्र' नजर आता है"
त्यावर उदयने लगेच मला "कोपरखळी" मारली आहे.असो.
सध्या मी ब्रिटिश राजाश्रय मिळालेला व्हेनेझूएलाचा "कृष्णवर्णीय" संगीतकार "Edmundo Ross" यांची माहिती सांगतो आहे.
त्याचा उद्देश जन्म श्रेष्ठ नसतो तर "कर्म श्रेष्ठ" असते हे तत्वज्ञान सांगणे असा आहे."जन्मापेक्षा कर्मश्रेष्ठ" हा संदेश ज्यांच्या जीवनातून मिळतो असे सर्वजण मला प्रिय आहेत.आज उदयने अशाच एका कर्मवीराचा साक्षात्कार घडवला.कोण आहेत ते ? वाचा.
"Edmundo Ros" made a remarkable reinvention of his life: the mixed-race "outsider" successfully challenged the British class system, to become, as he put it, "a respected gentleman".
आज अशाच एका "कुंभार" समाजातील कलाकाराची माहिती सांगतो.ऐका.
'प्यार कीया तो डरना क्या’ हे गाणं मधुबालावर नव्हे तर एका "पुरुषा" वर चित्रित झालेलं आहे हे ऐकून माहित होते.पण तो संपूर्ण किस्सा उदयमुळे आज कळाला.या गाण्यात "मधुबालाचा मुखवटा" धारण करून "लक्ष्मी नारायण" हा पुरुष नृत्यकार नाचला आहे आणि त्यांना "मधुबालाचा चेहरा" देणारा शिल्पकार म्हणजे बी.आर.खेडकर ! त्यांनी अगदी १५ मिनिटांच्या अवधीत मधुबालाच्या चेहऱ्यातील बारकावे हेरून तिचा हेबहुब एक रबरी "मास्क" बनवला.हा भारतात बनवलेला पहिला रबरी मास्क होता.अशा रीतीने तो मुखवटा धारण करून लक्ष्मी नारायण यांनी ‘प्यार कीया तो डरना क्या’ या गाण्यावर अप्रतिम नृत्य केलं आणि मधुबालाचं हे गाणं अजरामर झालं. आज आपल्याला जशी मधुबाला आठवते तसे लक्ष्मी नारायण आणि शिल्पकार खेडकर यांची मेहनतसुद्धा आठवायला हवी.
Comments