"सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची जागतिक ओळख
- dileepbw
- Sep 30, 2020
- 2 min read
Updated: Sep 5, 2022
मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.
मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)
इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
N.S.Gill या अभ्यासकाने लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांना जगभरातील लोक काय नावाने ओळखत असत याचा खालील प्रमाणे अभ्यास केला आहे :-
१. Hesiod हा ग्रीक महाकवी त्याच्या महाकाव्यात "सका/शक/Scythian" लोकांचे वर्णन "घोडीचे दूध पिणारे लोक (hippemolgi)" असे करतो.
२. Herodotus हा ग्रीक इतिहासकार पश्चिमेकडील म्हणजे युरोप जवळील "सका/शक/Scythian" लोकांचे वर्णन "धनुर्धारी (Scythians)" असे तर पूर्वेकडील((Kazakhstan, Turkmenistan,Uzbekistan,Tajikistan,Kyrgyzstan येथील) म्हणजे चीन जवळील "सका/शक/Scythian" लोकांचे वर्णन "साकी(Sacae)" असे करतो.
३. ग्रीक भाषेत धनुर्धारी म्हणजे "Skudat" किंवा "Skythai" ! त्यामुळे ग्रीक भाषेत "सका/शक/Scythian" लोकांना "Skudat" किंवा "Skythai" असे म्हटले जाते.
४. सका/शक/Scythian" लोक "Getae" या नावाने देखील ओळखले जात असत.
५. पारशी लोक "सका/शक/Scythian" लोकांना "सकाई" म्हणून ओळखत असत.
६. Urartu या प्रांतातील Armenian लोक व Assyrian लोक आपल्या "सका/शक/Scythian" शत्रूंना "Ashguzai/ Ishguzai" " म्हणून ओळखत असत.
७. बायबल या ख्रिश्चन धर्मग्रंथात "सका/शक/Scythian" लोकांना "Ashkenaz" असे म्हटले आहे.
८. ब्रिटिश काळात व स्वातंत्र्यानंतर देखील सुमारे २५-३० वर्षांपर्यंत "लाडसका" म्हणून ओळखले जाणारे व तशी नोंद सर्व सरकारी कागदपत्रांवर(उदा.जन्माचा दाखला,शाळा सोडल्याचा दाखला, राजपत्रे इ.) असणारे सध्याचे "लाडशाखीय" वाणी समाज बांधव "सका" चे "शाखीय" झाले ते अॅड.विनय जायखेडकर यांच्या समाजाचे "सांस्कृतीकरण" करण्याच्या प्रयत्नातून ! त्यांच्या प्रयत्नाने शेती,दुकानदारी,सावकारी असे पारंपारिक व्यवसाय करणारा हा तुलनेने अशिक्षित/अर्धशिक्षित समाज शिक्षणाकडे वळाला व ग्रामीण भागातून शहरांमधे स्थलांतरीत झाला.त्यांची संख्या वाढली तशी "सका" या वंशवाचक शब्दाचे "शाखीय" असे "सांस्कृतीकरण" झाले."लाड" म्हणजे प्राचीन लाटदेश,सध्याचा गुजरात" ! मुस्लिम आक्रमणांच्या काळात हा समाज सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात स्थलांतरीत झाला.त्यामुळे "लाड" हा भौगोलिक स्थानवाचक शब्द देखील कालबाह्य झाला.बर्याच समाज बांधवांनी आपल्या वैयक्तिक सरकारी कागदपत्रांमधून तो हटवला.पण त्यामुळे आपण वेगळ्याच पोटजातीत समाविष्ट होतो,हे त्यांच्या त्यावेळी लक्षात आले नाही.पण विवाह जुळविताना किंवा जातीचा दाखला घेताना मात्र अडचणी निर्माण झाल्या.सध्या विवाह जुळविताना
पोटजातीकडे दुर्लक्ष केले जात आहे.विशेषत: "लिंगायत" या पोटजातीला प्राधान्य दिले जात आहे.काळाची गरज म्हणून या विचाराची व्याप्ती वाढवून केवळ आंतरउपजातीयच नव्हे तर आंतरजातीय विवाहांना देखील प्रोत्साहन देण्याची वेळ आलेली आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता,कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.
Comentários