सका/शक/Scythian/ऋषिका/कम्बोज
- Dec 11, 2022
- 1 min read
"महाराष्ट्रातील "सका/शक/Scythian" वंशाच्या "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या नावातील "सका" या शब्दाचा अर्थ"
"डॉ.व्ही.एस.अगरवाल" हे इतिहासतज्ञ "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या "ऋषिका" या जमातीला सुरुवातीला सायबेरिया प्रांतामध्ये पशुपालन करणारी, त्यानंतर "वाम्क्षु” नदीकाठी शेती करणारी करणारी व त्यानंतर व्यापार करण्यासाठी अनुक्रमे गांधार(अफगाणिस्तान), काश्मीर, पंजाब, राजस्थान, सौराष्ट्र, गुजरात व सरते शेवटी महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालेली मंडळी असे मानतात.
"प्राध्यापक स्टेन व डॉ.पी.सी.बागची(Prabodh Chandra Bagchi,18 November 1898 – 19 January 1956 was one of the most notable Sino-Indologists of the 20th century. He was the third Upacharya(Vice-Chancellor) of Visva-Bharati University - कृपया फोटो पहा) या इतिहासतज्ञांच्या मते महाराष्ट्रातील "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या "ऋषिका" या जमातीच्या शेजारी "तुषार/तुखार/तोखराई/तोकराई" या "हूण" वंशाच्या जमाती वास्तव्याला होत्या.(कृपया नकाशा पहा)
"डॉ.जे.सी.विद्यालंकार" हे इतिहासतज्ञ मात्र "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या "ऋषिका" जमातीच्या लोकांना "सका/शक/ Scythian" वंशाऐवजी "कुशाण" वंशाचे घटक मानतात.
संस्कृत भाषातज्ञ व महाभारताचे थोर अभ्यासक "श्री.ईश्वर मिश्रा" महाभारतामधील श्लोकांचा(5.5.15 व 2.27.25) संदर्भ देवून असे सांगतात की "लाड सका(लाड शाखीय) वाणी" समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची "ऋषिका" ही जमात "कम्बोज" लोकांची उपशाखा आहे.
या सर्व तज्ञांच्या मताचा सम्यक विचार केला असता महाभारतात वर्णन केलेले हे "पंचगण" एकमेकांशी विवाह बंधनाने बांधले गेले असावेत व त्यामुळे तत्कालीन भारतीय लोक त्यांना एकच समजत असावेत.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments