top of page

"सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज

  • dileepbw
  • Sep 22, 2022
  • 3 min read

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांच्या धार्मिक संकल्पनांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने अनेक संशोधक जगभर कार्यरत आहेत.त्या पैकी काही संशोधकांचा व त्यांच्या संशोधनाचा अल्प परिचय आपण करून घेऊ या :-

संशोधकांची नावे -

Ellis H.Minns

Mikhail I.Rostovtsev

S.S.Bessonova

V. I. Abaev

Renate Rolle

Henrik S.Nyberg

Geo Widengren

Georges Dumézil

प्रसिध्द झालेले संशोधन :-

1.Scythians and Greeks,Cambridge,1913

2.Iranians and Greeks in South Russia,Oxford,1922

3.Religioznye predstavleniia Skifov,Kiev,1983

4.Ocherki ideologii skifo-sakskikh plemen: Opyt rekonstruktsii skifskoi mifologii, Moscow,1977

5.Osetinskii iazyk i fol'klor,Moscow,1949.

6.Totenkult der Skythen, vol. 1 of Das Steppengebiet, 2 vols,Berlin,1978

7.Die Religionen des alten Iran,Leipzig,1938

8.Die Religionen Irans,Stuttgart,1965

9.Romans de Scythie et d'alentour,Paris,1978

सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे. रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.

मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात,अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्‍या,इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते.हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)

इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

विविध अभ्यासकांनी "सका/शक/Scythian" धार्मिक संकल्पनांचा सखोल अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की मध्य आशियातील "सका/शक/Scythian" व अन्य भटक्या टोळ्यांच्या धार्मिक संकल्पना या समस्त मानवजातीच्या स्थैर्यासाठी व विश्वकल्याणासाठी होत्या.Indo-Iranian संकल्पनांप्रमाणेच "सका/शक/Scythian" देवता या ब्रह्मांडाचे रूप मानल्या जात होत्या.या देवतांची नावे,त्यांचे ब्रह्मांडातील रूप व त्यांची Indo-Iranian-Greek संकल्पनांमधील नावे या संशोधकांच्याच शब्दात प्रमाणे :-

१.Goddess of fire and the hearth -

Tabiti (Iranian -Tarayati, "the flaming one, the burning one")

२.The conjugal couple(मिथून) -

Papaeus(? father) and Api (from the Iranian ap - "water") - marriage of heaven and earth (or water) as a cosmogonical act.

३.Targitaus(Papaeus व Api यांचा पूत्र) -

Forefather of the Scythian people and of the Scythian royal dynasty.

The world of people(middle zone of the cosmos)

४.Herakles -

Four sides of the world as a structure regulating the universe, and of four gods as their custodians.

५.Artimpasa/Aphrodite -

(Iranian Arti/ Ashi) - a deity connected with the idea of material abundance

६.Ares -

(Iranian Verethragna) - war god

७.Oetosyrus/Apollo

८.Three sons of Targitaus -

Three zones of the cosmos.Scythian society was divided into three categoties :- warriors,priests and agriculturalists.There were also deities that were venerated by separate tribes.

११.Thagimasadas -

Royal Scyths worshiped Thagimasadas identified by Herodotus with Poseidon.

इराणी भाषा बोलणार्‍या या भटक्या "सका/शक/Scythian" लोकांना लेखन कला अवगत नव्हती.त्यामुळे त्यांच्या धार्मिक संकल्पना उत्खननात सापडलेले त्यांचे पुरातन अवशेष व लेखन कला अवगत असलेल्या ग्रीक तसेच रोमन लोकांच्या नोंदींवरूनच समजावून घ्याव्या लागतात.

(संदर्भ - God or Goddess Of Greek)

ग्रीक अभ्यासक "हिरोडोटस" याने "सका/शक/Scythian" लोकांच्या देवतांचे तीन स्तरावर वर्गीकरण केले असून त्यांचे कंसात नावे दिलेल्या ग्रीक देवतांशी असलेले साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

१.Tabiti(Hestia)

२.Papaeus(Zeus) & Api (Gaia)

३.Oetosyrus/Goetosyrus (Apollo);Artimpasa/Argimpasa(Aphrodite Ourania);

Targitaus/Herakles/Ares.

(संदर्भ - Herodotus, 4.5–10)

कायम भटकंती करत असल्यामुळे "सका/शक/Scythian" लोकांची पक्की प्रार्थनास्थळे अथवा देवतांच्या मूर्त्या आढळत नाहीत. पण जेथे त्यांनी आपले साम्राज्य स्थापन केले तेथील प्रत्येक प्रभागात त्यांनी प्रशस्त लाकडी चौरसाकृती चौथरे(brushwood altars) मांडले व त्यावर "शक्ती" चे प्रतीक म्हणून एक तलवार खोचून ठेवलेली असे.हेच "सका/शक/Scythian" लोकांचे प्रार्थनास्थळ(cultic structures) असायचे.

"Ares" ही "सका/शक/Scythian" लोकांची "शक्ती देवता" ! त्यामुळे या लाकडी चौथर्‍यांना "शक्ती मंदीरे" समजायला हरकत नाही. या मंदीरांवर चढण्यासाठी त्याला एका बाजूने पायर्‍या केलेल्या असत.त्यावरून चढून चौथर्‍यावरीला तलवारीला

"नैवेद्य(पशुबळी तसेच नरबळी)" दाखविला जात असे.

(संदर्भ - Herodotus, 4.62).

हा चौथरा(cosmogram) म्हणजे "सका/शक/Scythian" लोकांच्या साम्राज्याचे प्रतीक व तलवार म्हणजे संपूर्ण विश्व ज्या अक्षाभोवती फिरते आहे तो अक्ष/आस(axis mundi) अशी "सका/शक/Scythian" लोकांची संकल्पना होती.या "अक्ष/आस(axis mundi)" मुळे "सका/शक/Scythian" साम्राज्य देवांच्या साम्राज्याशी जोडले जाते अशी त्यांची संकल्पना होती.

सका/शक/Scythian" लोकांच्या या "शक्ती मंदीर" मध्ये तांब्याचा एक मोठा "भाता(caldron)" ठेवलेला असे. या भात्याला सर्व पृथ्वीचा केंद्र बिंदू समजून त्याची मनोभावे पूजा करून त्यात प्रत्येकाकडून एक "बाण" वाहिला जात असे.दरवर्षी शक्ती मंदीर" येथे एक जत्रा आयोजित केली जात असे व तेथे "Tabiti" या देवतेकडून "सका/शक/Scythian" लोकांना वरदान म्हणून मिळालेल्या "नांगर,जू,कुर्‍हाड व चषक" या सोन्याच्या गोष्टींचे पूजन केले जात असे.या वस्तूंचा सांभाळ करणे व वर्षातून एकदा त्यांचे पूजन करणे ही "सका/शक/Scythian" राजाची महत्वाची जबाबदारी असे.नियोजित "नरबळी" ला जत्रेच्या काळात या वस्तूंच्या सान्निध्यात एक रात्र झोपावे लागत असे.दुसर्‍या दिवशी घोड्यावरून एका दिवसात तो जेवढी रपेट मारेल तेवढी जमीन त्याच्या मालकीची होत असे व त्याला त्या जमिनीचा "तात्पुरता राजा" घोषित केले जात असे."सका/शक/Scythian लोकांच्या दंतकथेतील Targitaus या राजाचा तृतीय पुत्र Colaxais याची ही स्मृती असावी असे "हिरोडोटस" या ग्रीक संशोधकांचे मत आहे.

(संदर्भ - The Soviet Iranologist V.I.Abaev)

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता. त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता, कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.

"सका/शक/Scythian" लोकांच्या या वार्षिक "शक्ती पूजन" समारंभाच्या संदर्भात लाड सका(शाखीय) वाणी समाजातील "कुलदेवतांचे पूजन म्हणजे शक्ती पूजन" याचा अभ्यास करून त्यातील साधर्म्य शोधावे.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page