top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ११"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ११"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाची पूर्वसंध्या अत्यंत संस्मरणीय ठरली.जवळ जवळ शेकड्यात जमलेले "ओल्ड माॅंक्स" कशाच्या तरी धुंदीत बेभान होऊन नृत्य करताना पहाणे हा एक विलक्षण अनुभव होता.मग ते "मेरा नाम चुनचुन चू" सारखे प्राचीन गीत असो नाही तर "उरात धडधड झाली" सारखे अर्वाचीन गीत असो ! सगळेच "सैराट" झाले होते.

राणी मुखर्जी सारख्या बसक्या आवाजात मन्या आगरवालने

"आजा आजा मैं हूॅं प्यार तेरा" अशी साद घालताच नसलीसारखे अनेक "ओल्ड माॅंक्स" एकदम रंगात आले व ठेका पकडून मंचावरच नाचू लागले."काॅंरवा" बढता गया ! अजस्त्र देहयष्टी लाभलेल्या "ब्रेझनेव्ह" युवराज पवारने नाजुक ऐश्वर्या राॅयचे रूप धारण करून रंगमचावर "ठुमके" मारायला सुरूवात करताच मुलींना देखील नाचायचा मोह आवरला नाही.दीप्याने तर कमालच केली.त्याच्या या गाण्याने सर्वांनाच आपआपल्या खुर्च्या सोडून नृत्यमंचावर येणे भाग पाडले !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page