"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १३"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
Updated: Dec 4, 2023
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग १३"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
गटावर "विळा-भोपळा" नातेसंबंध असलेल्या मंगलप्रभा पवार(देडगे)ला सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच भेटलो.माझ्या "स्मृती" बद्दल सर्वांनाच खात्री असताना या "धारच्या राणीसाहेब" मला कशा आठवत नाहीत याचा खुलासा स्नेहसंमेलनात झाला.
पक्या सोडून कुणालाच मंगलप्रभा आठवत नव्हती हीच माझ्या दृष्टीने "जमेची बाजू" होती.आमचे हे गटावरील "साप-मुंगूस" नाते शेवटी पक्याने बॅक्वेमधे "मदिरेच्या चषकात" साफ बुडवून टाकले. ही माझ्या दृष्टीने स्नेहसंमेलनाची मोठीच "जमेची बाजू" ! आता यापुढे आमची भांडणे गटावर ऐकू येणार नाहीत.का ते सांगतो,ऐका !
दुसर्या दिवशी नाश्त्याच्या वेळी मंगलप्रभाने मखमलीच्या रेशमी बटव्यात गुंडाळलेली एक "दागिन्याची पेटी" सर्वांच्या समक्ष माझ्या हातात ठेवली.स्नेहसंमेलनाला हजर असलेल्या बहुतेक सर्व मुलींना याची कल्पना आधीच असावी.कारण अरूणाने लगेच मला झाला का दोघांचा "समेट" अशी विचारणा केली.
प्रसन्नाने काल डाॅ.मोहन आगाशेसरांचा परीचय करून देताना जशी "या टोपी खाली दडलय काय" या "सामना" मधल्या गीताची आठवण करून दिली होती त्याच प्रमाणे मी "या दागिन्याच्या पेटीत दडलय काय" हे सांगतो.ऐका.
या दागिन्याच्या पेटीत दडले होते "भातुकलीमधले शेगदाण्याचे लाडू" ! मी जरी मंगलप्रभाला विसरलो होतो तरी ती काही मला विसरलेली नव्हती.ती मला इयत्ता पाचवी पासूनच ओळखते.माझ्या लोकमान्यनगरमधील घराशेजारीच रहायची व आमच्या पंचवीस नंबरच्या इमारतीत "भातुकली" खेळायला यायची.अशी ही भातुकलीमधल्या शेगदाण्याच्या लाडवाची
कथा !
पक्याने आता आमचा "तह" घडवून आणलेला असल्याने तसेच तिने आपल्या सर्वांना नववर्षाची डायरी पेनसह भेट दिलेली असल्याने आता या "राणीआक्का" शी यापुढे कुणीही भांडायचे नाही.समजलं ना ?
Comentarios