top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २४"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 2 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग २४"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

मंगलप्रभाचे व माझे "विळ्या भोपळ्याचे नाते" सर्वांनाच माहित असल्याने तिचे "कविता वाचन" सुरू होताच सर्वजण सरसावून बसले.माझ्या शेजारी बसलेला जीभाऊ लगेच माझ्या कानाशी लागला व पुटपुटला "भोग आता आपल्या कर्माची फळे" ! मी पण मग कान टवकारले.पहिली कविता होती "नातं मनातलं" ! वाचा !

"नातं मनातलं"

तुझं अन् माझं

असं प्रेमात मैत्रीत कधीच नसतं...

असतं एक मन प्रेमात न्हायलेलं..

अवखळ निरागस स्वप्नात रमणारं ..

आठवणींच्या झुल्यावर झुलणारं.

निर्व्याज्य बाल्य आणि तारुण्य अनुभवणारं !

असते भेटीची आतुरता

भातुकलीच्या खेळाची समरसता

अन् प्रेमाच्या गठीची एकरुपता ...

हळव्या ह्या नात्यात जवळीक असते भावनांची

दूर असतानाही सोबत असते आठवणींची

आसवं वाहुन नेतात विरह आणि कटु आठवणी

अन् ओठ फक्त प्रेमाची गाणी !

नातं हे विश्वासाचं जीवन भराच्या सोबतीचं

फक्त जपायचं असतं

तुझ् अन् माझं असं द्वैत

प्रेमात कथीच नसतं..!

पण... हरवुन जातं जेव्हा ..

जीवापल्याड.. जपलेलं हे नातं....

तेंव्हा डोळ्यात आंसू व

ओठावर हसू घेऊन

संपेल केंव्हा तरी रुसवा दुरावा

अन् घडेल पुन्हा भेट एखाद्या वळणावर..

ह्या गोड आशेवर जीवन जगायचं असतं....

तुझं अन् माझं अस् द्वैत प्रेमात मैत्रीत कधीच नसतं !

रोज तोफगोळे झेलत असताना अचानक हा "फुलांचा वर्षाव" कसा काय सुरू झाला ? कुणालाच काही कळेना.सर्वांनी समोरचा "मद्याचा चषक" उंचावला व एकमेकांना चिअर्स करून एकाच घोटात त्याला अस्मान दाखविले.शेजारच्या जीभाऊने चिमटा काढताच मी एकदम भानावर आलो व बरळलो "तो मी नव्हेच" ?

तेवढ्यात मंगलप्रभाने दुसरी कविता सुरू केली.तिचे शीर्षक होते "झासीकी रानी" ! मनातल्या मनात म्हणले हीच खरी मंगलप्रभा ! ऐका.तुम्हाला पण पटेल.

"झासीकी रानी"

रानी झासीकी कभी हारेगी नही

लढेगी अकेले अपने ऊसुलोंके लिये

पर पिछे हटेगी नही

ये जंग है उसकी अपनी

ये सपने है उसके अपने

कोई समझे या न समझे

कोई साथ चले ना चले

चल पडी हैं जोशमे अपनेही होषमे...

करने पुरे अरमान अपने

उसे क्या जरुरत किसी की

वो तो रानी है झांसी की.......

हं ! आत्ता जमले ! हीच खरी मंगलप्रभा ! तुम्हाला काय पटते ? वाटते ? समजते ?

Comments

Rated 0 out of 5 stars.
Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.
bottom of page