top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३०"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३०"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

जोपर्यंत विनायक करमरकरचा "खजिना" संपत नाही व सर्वजण नाचायला मैदानात उतरत नाहीत तोपर्यंत सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन "यशस्वी" झाले असे समजायचे नाही अशा दोन गोष्टी आधीच ठरवलेल्या होत्या.खजिना रिता झाला की अजय-अतुलचे "झिंगाट" सुरू करायचे व जेवायला पाने घ्यायची असा "परवलीचा संदेश" किचनमधे आधीच गेलेला होता.आणि अखेरीस "झिंगाट" सुरू झाले. त्याबरोबर सुभाष सुराणा जोरात ओरडला अरे माझा रोल आहे या सिनेमात ! नागराज मंजुळे दोस्त आहे आपला ! मग काय ! सर्वांनाच नाचायला स्फुरण चढले ! ऐका पुन्हा एकदा हे गाणे !

उरात होतंय धड धड लाली गालावर आली

आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली

आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया

आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया

उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं

तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलं

हात भरून आलोया, लई दुरून आलोया

आन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया

आगं समद्या पोरात, म्या लई जोरात रंगात आलंया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई

कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई

आता तराट झालुया तुझ्या घरात आलुया

लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया

आगं ढिंच्याक जोरात टेक्नो वरात दारात आलोया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

सगळेजण एवढे जोशात नाचले की सर्वांनाच पुन्हा एकदा "तहान" लागली.पण काचेच्या बाटल्यांमधले रंगीत पाणी संपलेले असल्याने शेवटी कॅनवरच भागवावे लागले ! सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनांची सांगता "वैशिष्ट्यपूर्ण" झाली याची ती पोच-पावतीच होती !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page