"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३२"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ३२"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
संयोजन समितीच्या वतीने संजूने सर्वांचे आभार मानलेले आहेतच.त्यात त्याने डाॅ.मोहन आगाशे सरांनी आपल्या "शिष्यवृती योजने" चे तोंड भरून कौतुक केल्याचे सांगीतले आहे.असेच कौतुक आपले बालरोगतज्ञ प्रा.राम धोंगडे यांनी देखील केले आहे.मिडीयाने पण ही संकल्पना उचलून धरलेली आहे.
अशीच योजना डाॅ.मोहन आगाशे सरांनी शासनाला देखील सुचवली होती.पण ती कार्यान्वित होऊ शकली नाही.आपले हे अनुकरणीय उदाहरण डोळ्यासमोर ठेवून अन्य बॅचेस तसेच आजचे लाभार्थी सुध्दा ही योजना पुढे राबवतील अशी अपेक्षा धरू या.
आता पर्यंत अंजली,दीप्या,प्रसन्ना,नरेंद्र सोनावणे,प्रकाश चिरमाडे,आसाराम,मन्या,उदय,निर्मला,सारंगधर पंडीत,जया,
मीना,नंदू ओसवाल,खेडकर,मेघू,रतनानी,मंड्या,बंड्या,जया आपटे,अरूण सोनावणे,सुरेश भोईटे,गजा मंकीकर,नंदू शहा यांनी सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या संयोजनाचे तोंड भरून कौतुक केले आहे.आसाराम व दीप्या इव्हेंट मॅनेजर दीपालीचे कौतुक करायला देखील विसरलेले नाहीत.हे विशेष !
कुठल्याही सार्वजनिक कार्यात "कमी-अधिक" हे होतच असते. त्यामुळे कुणाला काही "उणे-दुणे" काढायचे असल्यास अवश्य काढा.कारण आपल्याला अजून स्नेहसंमेलने करायची आहेत.त्यावेळी अधिक काळजी घेता येईल !
Comments