top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५१"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५१"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलना" चे स्थान अतिशय रमणीय व निवांत असले पाहिजे असा सर्वांचाच आग्रह होता.त्यामुळे पुणे शहराला "नेपथ्या" त टाकून "बिनीची शिलेदार" मंडळी मुळशी,सिंहगड पायथा,लोणावळा,खंडाळा अशी रपेट करून आली. मोहिम फत्ते झाली. लोणावळ्याच्या पार माथ्यावरील, घनदाट झाडीत लपलेले,दर्‍या-खोर्‍यात वसलेले, आजूबाजूला संरक्षणासाठी एक सोडून दोन किल्ल्यांचे बुरूज लाभलेले,धरणामुळे मुबलक पाण्याची सोय असलेले,किल्ले "अप्पर डेक रिसाॅर्ट" स्नेहसंमेलनासाठी मुक्रर करण्यात आले.

काय त्यो डोंगार,काय ती झाडी

काय ते हाटिल,एकदम ओक्के

काय ते भोजन,सुग्रास व रूचकर

किती पदार्थ, सारं काही स्वादिष्ट !

Comentarios

Obtuvo 0 de 5 estrellas.
Aún no hay calificaciones

Agrega una calificación
bottom of page