"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५५"
- dileepbw
- Dec 2, 2023
- 2 min read
Updated: Dec 3, 2023
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ५५"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !
"BJMC-1973 Batch" ही दोनशे विद्यार्थ्यांची ! प्रवेशाच्या वेळीच प्रमोद धायगुडे,श्रीकृष्ण वाणी,मंगल पवार,बीना मेहता अशा काही विद्यार्थ्यांचे उन्नीस-बीस झालेले.अजून देखील काही असतील.अशा "लेट लतीफ" मित्रांनी आपल्या प्रवेशाची "चित्तरकथा" आज सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने तरी सर्वांना जरूर सांगावी.
प्रथम वर्षात असतानाच आपण "शशी वरण" ला गमावले. प्रथम वर्षाच्या निकालामुळे काही जण मागे पडले.ते तर आपलेच ! पण ते दुसर्या वर्षापासून आपल्या खांद्याला खांदा लावून लढले नाहीत.असे कोण ?
त्यांची जागा अन्य महाविद्यालयातील मित्रांनी (दिलीप सारडा,शिरीष पटवर्धन, मंगल पवार,सुरेश टिक्कू, लिम-लिओ हाॅई इ.) घेतली.तर आपल्यातले काही जण (प्रदीप मुतालिक,सुरवाडे) आपल्याला सोडून अन्य म

हाविद्यालयात गेले.
आपल्या दुसर्या वर्षात यात मोठ्या प्रमाणावर भर पडली ती कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादग्रस्त(प्रकाश फडणीस,राजा वखारीया,निकीत मेहता,सपना दोशी,बीना मेहता, इ.) विद्यार्थ्यांची ! त्यांच्या कथा तर फारच चित्तथरारक ! सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा परीचयाच्या कार्यक्रमात ते वेळेअभावी सांगता आले नाही.आता तरी सांगा !
आपल्या दुसर्या वर्षात आपल्याशी जोडला गेलेला अजून एक मोठा गट म्हणजे १९७२ च्या तुकडीतील रिपीटर्स (आर.आर.परदेशी,डी.बी.परदेशी,कर्तारसिंग परदेशी,युवराज बाविस्कर,ठवर,मोकाशी,दैठणकर इ.) !
आफ्रिकेतून आलेल्या रश्मी कोठारीची सुरस चमत्कारिक कथा कुणाला माहित आहे का ? आज मंगलची "कथा व व्यथा" कळाली.सायन्स काॅलेजची दोन वर्षे पुण्याच्या माॅडर्न काॅलेजमधे शिकलेली ही स्वातंत्र्यसैनिकाची कन्या बीजेच्या प्रतिक्षा यादीत होती.शेवटी सोलापूर व गोवा येथे प्रवेश मिळाला.त्यापैकी सोलापूरला MBBS चे पहिले वर्ष शिकून दुसर्या वर्षात आपल्याबरोबर आल्याने अनेकांना ती आठवत नाही. तिचा काॅलेजमधला मित्र परिवार म्हणजे मेढे,म्हसदे,महाले,परमार,RR परदेशी,सपना दोशी,प्रकाश फडणीस इ. वसतीगृहनिवासी असल्याने जया तोडमल तिची मैत्रिण !
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा" मांडताना आरतीने हा "लेखाजोखा" पण मांडायला हवा.म्हणजे दोनशेचे सव्वा दोनशे कसे झाले याचा शोध लागेल.त्यापैकी फक्त १४२ जण गटावर कसे ? बाकीचे कुठे गेले ? देवाघरी गेलेल्यांना पण आपण शोधले. मग यांना कुणी व कसे शोधायचे ?
Comments