top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६६"

  • dileepbw
  • Dec 2, 2023
  • 1 min read

Updated: Dec 10, 2023


"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ६६"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन" काही जणांच्या कशामुळे लक्षात राहील तर ते अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळाच्या खाद्यसंस्कृतीमुळे व मद्यसंस्कृतीमुळे !

गेल्या गेल्या पानावर बसायची "चोख व्यवस्था" असल्याने सगळे थेट पंगतीलाच बसले.शाकाहारी व मासाहारी असे दोन्ही बेत असल्याने मंडळी भरपेट जेवत "भरपेट गप्पा" देखील मारीत होती.तृप्त पोटाने व तृप्त मनाने मंडळी रूममधे जाऊन विसावली.

त्यांची "वामकुक्षी" ही "कुंभकर्णाची झोप" ठरू नये व कार्यक्रमास उशीर होऊ नये म्हणून भर दुपारच्या पण लोणावळ्याच्या कोवळ्या उन्हात पारंपारिक वेषभूषेत नटून-थटून "सामूहिक फोटो" काढायचा,१००% उपस्थितीची हमी देणारा उपक्रम आयोजित केला होता.

"पैठणीचे बोजे व नथीचे ओझे" सावरत हमखास उशीरा येणारा महिलावर्ग या वेळी सर्वात आघाडीवर होता.बहुधा जेवण अंगावर आले नसावे त्यांच्या ! त्यामानाने पुरूष मंडळीच "ढिल्ली" पडली.वामकुक्षी करता करता "डोळा लागला" हो ! त्यामुळे तीन तीनदा फोटो रिपीट करावा लागला हो !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page