top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ७"

  • dileepbw
  • Dec 1, 2023
  • 1 min read

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ७"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !

भारतीय संस्कृतीमधे कुठल्याही शुभकार्याचा प्रारंभ गणपतीबाप्पांचे आशिर्वाद घेतल्याशिवाय होत नसतो.त्याला आमचे सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन तरी कसे अपवाद असणार ? करमणूकीचे कार्यक्रम सादर करायला "प्रोफेशनल्स" ना बोलवायचे का आपले आपणच सादर करायचे साच्यावर बराच खल करून शेवटी "साठ वर्षांच्या असून म्हातार्‍या सांगत्यात वय बाई सोळा" म्हणत प्रतिमा, आरती,अरुणा,जया,अंजली व अलका यांनी अक्षरश: कंबर कसली व साक्षात गणपतीबाप्पाच आरतीच्या रूपात रंगमंचावर अवतरले.

रूपेरी पडदा गाजवणार्‍या "राधिका आपटे" ची साठी ओलांडलेली आई म्हणजे माझी हाॅस्पिटल बॅचमेट "जया सेवलेकर" त्याच लवचिकतेने रंगमंचावर लवलवताना पाहून नेत्र सुखावून गेले.गेल्याच महिन्यात इंग्लडला भेटली तेव्हा "मी जरा लवकरच निवृत्त झाले रे" अशी हळहळणारी प्रतिमा रंगमंचावर थिरकताना पाहून क्षणभर माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना !

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page