top of page

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ७२"

  • dileepbw
  • Dec 3, 2023
  • 2 min read

Updated: Dec 10, 2023

"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ७२"

"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन ! नसली व दीप्याचे विशेष अभिनंदन ! त्यांनी पुढाकार घेतलेली "BJMC-1973 Batch Scholarship" योजना आता आपल्या बॅचच्या बाहेर देखील चांगलीच मुळे धरू लागली आहे.अभिनंदन !

अंजली मंगरूळकर(दीप्ती वैद्य) ने एक आठवडा झाला तरी अजून सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाची "नशा" अजून उतरलेली नाही असे म्हणताच पक्याच्या कवित्वाला उधाण आले आहे.संजूच्या लेखावर पक्याने "अप्रतिम" अशी प्रतिक्रिया दिली असून नसलीने सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला "अप्रतिम" असे म्हटले आहे.जयाने असे

स्नेहसंमेलन दरवर्षी व्हायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.त्यावर आसारामने मी "कार्यास रदैव तत्पर" आहे सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.मी अधिक काय लिहू व किती लिहू ?

किशाने एक चांगली सूचना केली आहे."BJMC-1973 Batch" मधील उत्कृष्ट सामाजिक(सुभाष सुराणा), राजकीय (सुधिर तांबे व जितेंद्र जामदार),वैद्यकीय(नसली),तांत्रिक (जयंत सरवटे) व शैक्षणिक(विवेक जोशी) कार्य करणारे तसेच सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनासाठी खास परदेशातून कार्यक्रमासाठी आलेले(राजीव मोतीवाला,प्रतिम कुंटे,मीना वैद्य,माधुरी पेठकर,हेमंत घाटे,नसीम मर्चंट ) यांचा विशेष सत्कार करायला हवा होता.पुढच्या स्नेहसंमेलनात अवश्य करू या.

सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनावर काव्य करणार नाही तर तो शीघ्रकवी शांताराम कसला ? वाचा त्याचे काव्य !

जमी थी महफिल छाये थे बादल

गगनमे जगमगी थी चांदकी रोशनी

उतरे थे तारे जमीन पर जगमगायी थी

फिरसे वह महफिल दिवानी

जले शमा उडे चिंगारी जले दिल

अब करके वह सारी यादे पुरानी

मिले थे किस्मतसे फिरसे आयी थी

रात मिलनकी वह बडी सुहानी

सदा खुश रहो सारे यारो

जीवनकी शाम याद करेंगे वह कहानी

इन्तजार हुआ खतम मिलतेही

जल्दी जल्दी बीत गयी घडी सुहानी

मन तरसे फिरसे मुलाकात को

अब भी आधी अधूरी रही है कहानी

ही कविता ऐकताच मंगलने देखील एकू चिरोळी प्रसवली आहे.वाचा.

भुरकन उडुन गेला वेळ असंच वाटलं येण्याजाण्यात ..

बी.जे.मधे तर काही आठवणी आल्या आणि गेल्या

ह्या पलिकडे दोस्तांच आजुबाजुला असणं एवढंच

तो एक काळ, काॅलेज त्याच क्षणात जगण

तो काळ गेला राहिली फक्त आठवण

ते तसंच पुर्वीच काही राहिलेलं नसतं

मन उदास होतं मग परत भेटु असं ठरतं

अजून कुणाच्या काय प्रतिक्रिया सुवर्णमहोत्सवी

स्नेहसंमेलनावर ?

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page