"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८४"
- dileepbw
- Dec 6, 2023
- 1 min read
"सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाचा लेखाजोखा - भाग ८४"
"BJMC-1973 Batch" चे वैशिष्ट्यपूर्ण सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलन शनिवार दि.२५ नोव्हेंबर,२०२३ रोजी अपर डेक रिसाॅर्ट,लोणावळा येथे व दि.२६ नोव्हेंबर,२०२३ रोजी बै.जी.वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झाले.सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !
१९७३ साली प्रवेशित झालेल्या २०० विद्यार्थ्यांमधील हयात असलेल्या १७० विद्यार्थ्यांपैकी १०२ विद्यार्थी या सुवर्णमहोत्सवी स्नेहसंमेलनाला उपस्थित होते.अनेक जण पन्नास वर्षांनी पहिल्यांदाच भेटत असल्याने सगळ्यांच्या गळ्यात मोठ्या अक्षरात नाव लिहिलेले "मंगळसूत्र" अडकविण्यात आले होते व सर्वांच्या परीचयाच्या एक दोन तासाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
"BJMC-1973 Batch" चे एक वैशिष्ट्य म्हणजे एकाही मुलीने बॅचमधील एकाही मुलाची "जीवनसाथी" म्हणून निवड न करता परदेशात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या ज्येष्ठ डाॅक्टर्सचीच निवड केली.त्यामधे प्रतिमा कुंटे,मीनाक्षी वैद्य, वंदना वर्तक व माधुरी पेटकर यांचा समावेश होतो.बहुतेकींनी भूलतज्ञ होणे पसंत केले.भारतीय महिला डाॅक्टरांना परदेशात स्थायिक होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हॅलिफॅक्स,लीड्स,इंग्लंडहून आलेल्या प्रतिमा कुंटे(चंद्रात्रे) ने कसा वर्णन केला आहे ते जरूर ऐका.
Comentarios