top of page

सेवाव्रती वहिनी सौ.प्रतिभा सुहास वाणी

  • dileepbw
  • Aug 26, 2021
  • 2 min read

माझी सेवाव्रती वहिनी सौ.प्रतिभा सुहास वाणी यांना वाढदिवसाच्या आपल्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा !


आमची वहिनी प्रतिभा म्हणजे "वडा" आणि माझा बंधू सुहास म्हणजे "पाव" ! ही जोडी म्हणजे "वडापाव" आहेत. पाव ज्याप्रमाणे वड्याला दोन्ही बाजूने सांभाळून घेतो आणि वडाही पावात घट्ट रुतून बसतो अगदी तसंच. वड्याला माहेरच्या (उकळत्या) तेलाची आठवण येऊन उकळ्या फुटत असतात.पाव यीस्टच्या फुशारक्या मारत फुगत जातो. वडापावाची चव मुख्यतः वड्यामुळे असते. संसाराला बायकोमुळेच अर्थ येतो.


भरपूर लाल तिखट, चवीपुरते मीठ, हळद, हिंग आणि किंचित साखर हे गुणही बायकोतच आढळतात.पावात असतो तो फक्त मैदा, निर्विकार नवऱ्यासारखा !


वड्यात मुख्य असतो बटाटा,कर्बोदकयुक्त जाडजूड अगदी बायको सारखा.पाव फक्त फुगलेला फुगा नवऱ्यासारखा !


बायको वड्यासारखी असते म्हणून वेड्यासारखी 'वडा'ला फेऱ्या मारते, आणि म्हणते "वडा पाव" "वडा पाव" ! नवऱ्याची 'पाव'लो 'पाव'ली काळजी घेते. आणि नवराही बायकोमुळे वेडा होऊन बायकोच्या 'पाव'लावर पाऊल ठेऊन आयुष्यभर खाली मान घालून मागेमागे चालत राहतो.

वडापाव ताजा गरम असतानाच चांगला लागतो, लग्नही ताजे नवीन असतानाच छान वाटते. वडापाव आणि लग्न शिळे झाले कि पोटातल्या आणि कोर्टातल्या तक्रारी वाढायला लागतात.


वडापाव खाताना पावाचे दोन भाग होतात. लग्न झाल्यावर नवऱ्याचेही दोन भाग होतात एकीकडे बायको दुसरीकडे आई. वडा मात्र आख्खाच राहतो !वडापाव सोबत आंबट चिंचेची चटणी, पाचक पुदिना चटणी, गोड टोमॅटो सॉस आणि तिखट मिरची हवी, चव वाढते. नवरा बायकोतही चिंचेसारखे आंबट शौकीन प्रेम, पुदिन्यासारखी पाचक काळजी, टोमॅटो सारखे गोड हास्य आणि रागाची थोडीशी मिरची हवीच, संसार फुलतो त्यामुळे !


वड्याला उकळत्या तेलात आणि पावाला गरम गरम भट्टीतून जेव्हा काढले जाते तेव्हाच वडापाव खमंग आणि चविष्ट होते. नवरा बायकोही जगण्याची ओढाताण (वडाताण) सहन करून, दुःखाचे कडक तेल पचवून, अनुभवाच्या भट्टीतून बाहेर निघतात तेव्हाच संसारही चविष्ठ होतो, रुचकर होतो !


पण त्यासाठी "पावा" ने खालील पथ्ये पाळणे आवश्यक आहे :-


१."वड्या" ने डोळे वटारून पाहिलं तर तिच्या "डोळ्या" ला "डोळा" भिडवायचा नाही.

२.शेजारणीला "डोळा" मारायचा नाही.

३.कशावरही "डोळा" ठेवायचा नाही.

४.फिरताना कुणाच्या "डोळ्यात डोळा" घालून पहायचं नाही.

५.समोरून येणारीच्या "डोळ्या" तले भाव वाचायचे नाहीत.

६.कुणालाही "डोळे" भरून पहायचं नाही.

७.वड्याच्या "डोळ्या" तले कुसळं पाहायचं नाही.

८.वड्याकडे काना"डोळा" करायचा नाही.

९.वड्याकडे "डोळे" वटरायचे नाहीत.

१०.वड्याच्या "डोळ्या" त अंजन घालायचं नाही.


असे "डोळे" हे जुलमी गडे असलेल्या प्रतिभाला आपल्या सर्वांतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page