सोमवर्गीय शक(Saka haumavarga)
- dileepbw
- Sep 29, 2022
- 1 min read
"सका/शक/Scythian" वंशाच्या लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाच्या धार्मिक धारणा
"ऋग्वेदा" मधील १०२८ ऋचां पैकी सर्वात जास्त "ऋचा" या "देवेंद्र" म्हणजे देवांचा राजा "इंद्र" या करिता रचलेल्या आहेत. त्या खालोखाल "अग्नी" व नंतर "सोमा" चा नंबर लागतो.
लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज भारतात स्थलांतरित होण्यापूर्वी, मध्य आशियात वास्तव्याला असताना "नैसर्गिक गोष्टीं" ची पूजा(Shamanism) विशेषतः "अग्नीपूजन" करीत होता. आधुनिक वैज्ञानिक भाषेमध्ये या सर्व समाजाना "प्रोटो-इंडो इराणिअन" समाज असे म्हणतात.
लाड सका (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाचे "सका/शक/Scythian" वंशाचे पूर्वज या "अग्नीपूजक" समूहाचा एक महत्वाचा घटक होता. त्यामुळे लाड “सका” (लाड शाखीय) वाणी समाजामधील "देव" कुलाचा वृतांत लिहिताना "सका" म्हणजे "शक/ Scythian" लोकांचा अभ्यास केला पाहिजे.
जसे "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांचे पश्चिमेकडे स्थलांतर झाले व ते "वैदिक" संस्कृतीच्या जवळ आले तसे त्यांनी आपल्या मूळच्या “अग्नी” पूजे बरोबरच "सोम" पूजाही महत्वाची मानली.
अशा मध्य आशियातून स्थलांतरित झालेल्या "सका/शक/Scythian" वंशाच्या लोकांना शेजारील देश विशेषतः इराणी/पारशी/पर्शियन लोक "सोमवर्गीय शक(Saka haumavarga)" म्हणून ओळखू लागले.
इराणी लोकांनी मात्र तेव्हा पासून ते आजतागायत "अग्नी" चीच पूजा चालू ठेवली आहे. पारशी धर्मस्थळावर(अग्यारी) ती आपल्याला आजही पाहायला मिळते. (कृपया फोटो पहा)
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६
Comments