सामुदायिक विवाह सोहळा
- dileepbw
- Sep 14, 2022
- 2 min read
लाड सका(शाखीय) वाणी समाज हा प्रामुख्याने व्यापारी समाज ! व्यापारानिमित्त खेडोपाडी पसरलेल्या या समाजातील अनेक तरूण व्यापारामुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.
अशा मुलांच्या तुलनेत शिक्षणात उत्तम प्रगती केलेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजातील मुलींना शहराकडे धाव घेण्याची व नोकरीस प्राधान्य देण्याची ओढ लागलेली आहे.
अशा विषम परिस्थितीत ग्रामीण भागात व्यापार करणार्या अल्प शिक्षित मुलांचे विवाहयोग जुळविण्यात अडचणी येत आहेत.
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील समाज धुरीणांनी या समस्येवर विचार करून काही वर्षांपूर्वी "लिंगायत वाणी" या वाणी समाजाच्या पोटजातीशी "बेटी व्यवहार" सुरू केला.
आता पर्यंत "लिंगायत वाणी" समाजातील सुमारे २५०० मुली विवाह करून लाड सका(शाखीय) वाणी समाजात आल्या आहेत व या समाजाशी एकरूप होऊन गेल्या आहेत.
आज ही "लिंगायत वाणी" समाजातील मुलींच्या वधू-वर परिचय मेळाव्यास मिळणारा लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा प्रचंड प्रतिसाद आश्चर्यकारक आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "समाजप्रबोधन" या संस्थेचे संस्थापक श्री.सुनिलतात्या नेरकरांनी २००७ साली अशा ४१ संमिश्र वधू-वरांचा घडविलेला "सामुदायिक विवाह सोहळा" आज ही सर्वांच्या स्मरणात आहे.
आज ही लाड सका(शाखीय) वाणी समाजातील व्यापारा निमित्त खेडोपाडी पसरलेली हजारो मुले विवाहापासून वंचित आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून लाड सका (शाखीय) वाणी मुले व लिंगायत वाणी मुली असा एकत्रित वधू-वर परिचय मेळावा लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "चैतन्यदीप" या मुखपत्राने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षात लाड सका (शाखीय) वाणी समाजाच्या "समाज प्रबोधन संस्थे" च्या सहकार्याने आयोजित केला आहे.
"मे" महिन्याच्या अखेरीस संपन्न होणाऱ्या या विनाशुल्क परिचय मेळाव्याच्या व सामुदायिक विवाह सोहळ्याच्या आयोजनात "समाज प्रबोधन संस्थे" चे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुरेशबापू शिरूडे हे मुख्य संयोजकाची भूमिका बजावीत आहेत.
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील मुले व लिंगायत वाणी समाजातील मुली असे या कार्यक्रमाचे स्वरूप असेल.
संबंधित उमेदवारांच्या प्रवेशिका भरण्याचे काम शीघ्रगतीने सुरू झालेले आहे. "चैतन्यदीप" परिवारातील सर्व प्रतिनिधींकडे या प्रवेशिका उपलब्ध आहेत.१० मे ही प्रवेशिका भरण्याची अंतिम तारीख आहे.
संबधितांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती "चैतन्यदीप" चे संपादक व समाज प्रबोधन संस्थेचे राष्ट्रीय संघटक श्री.दीपक येवले यांनी केले आहे.
लाड सका(शाखीय) वाणी समाजातील गरजवंत मुलांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा.ही नम्र विनंती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी
व्यवस्थापक
फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - गट १ - ९४२२, गट २ - ४४५५, गट ३ - ३५७६)
Comments