top of page

सोळा कुलस्वामिनी -डाॅ.रां.चि.ढेरे यांचे संशोधन

  • dileepbw
  • Sep 17, 2022
  • 4 min read

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या सोळा कुलस्वामिनी

खालील प्रमाणे :-

१) श्री जोगेश्वरी देवी माता 👉मुंडी मांडळ

२) श्री म्हाळसा देवी माता 👉बेटावद

३) श्री मनुदेवी माता 👉 आडगांव

४) श्री एकवीरा देवी माता 👉 वणी

५) श्री जोगेश्वरी देवी माता 👉 जोगशेलू

६) श्री धनाई पुनाई देवी माता 👉जिरनेपाडा

७) श्री एकवीरा देवी माता 👉धुळे

८) श्री जोगेश्वरी देवी माता 👉बेटावद

९) श्री मठांबा देवी माता 👉 बेटावद

१०) श्री सुलाई देवी माता 👉उटांवद

११) श्री अन्नापूर्णा देवी माता 👉कापडणे

१२) श्री सारजा बारजा देवी माता 👉 बाहळ

१३) श्री खंबाबा देवी माता 👉 हिगंणी

१४) श्री पेडकाई देवी माता 👉चिमठाणे

१५) श्री आशापूरी देवी माता 👉 पाटण

१६) श्री भवानी देवी माता 👉वेळदा

ही सर्व "पार्वती,उमा,गौरी,शक्ती,उर्वी,हेमवती,देवी,काली,दुर्गा, अपराजिता,सती,आदी,पराशक्ती,मंगला,अपर्णा,कामाक्षी म्हणजे सृजनाची प्रेमदेवता,अंबिका,माता,माहेश्वरी,महामाता,भैरवी, रूद्रावतारी,भवानी,सृजनशीला,शिवाराधिनी म्हणजे शंकराची पूजक, रेणु,अन्नपूर्णा म्हणजे संपन्नतेची देवता,महाकाली म्हणजे विनाशकारी देवता या व अशा सहस्त्र नावांनी(संदर्भ - ललिता सहस्र नाम)ओळखल्या जाणार्‍या वैदिक धर्मातील "सृजनाच्या (निर्माणाच्या)" मातृदेवीची विविध रूपे मानली जातात व त्याच्या पूजकांना "शाक्त" पंथीय असे म्हणतात.

ही मातृदेवता निर्मिती,दैवी शक्ती,भक्ती,विवाह,मातृत्व,वात्सल्य, अपत्यप्राप्ती,सौख्य,एकरूपता यांचे प्रतीक मानले जाते.त्यामुळे लाड सका(शाखीय) वाणी महिला सातत्याने "दुर्गा सप्तशती,देवी महात्म्य,देवी भागवत,देवी पुराण,कुमारसंभव" या धर्मग्रंथांचे पारायण करताना व प्रसंग विशेषी त्यांचे पूजन करताना आढळतात.

वैदिक धर्मात "पार्वती" ही पर्वराज हिमवन(हिमवंत) व मीना यांची कन्या (गिरिजा,नगजा,शैलजा,शैलपूत्री,माहेश्वरी,गंगामातेची व भगवान विष्णूची भगिनी(नारायणी),सृष्टीचा विनाश करणारा संहारक व पुन:निर्मिती करणारा सर्वत्राता देव "शंकर" याची पत्नी व गणेश व कार्तिकेय यांची माता समजली जाते.पार्वती ही यज्ञात आहुती दिलेल्या शंकराची प्रथम पत्नी "सती" हीचा अवतार समजली जातो. पार्वती ही स्त्री(शक्ती) व पुरूष(शिव) यांना एकत्र आणणारी देवता समजली जाते."स्मार्त" पंथाचे लोक पार्वतीला "पंचायतन" चा भाग समजतात.तर "शैव" पंथाचे लोक पार्वतीला "शिवशक्ती" व सर्वांना सांधून मोक्षाकडे नेणारी देवता मानतात.त्यामुळे प्रत्येक शिव मंदिरात शिवलिंगाच्या अर्ध्या भागात "योनी" च्या स्वरूपात पार्वतीची स्थापना केलेली आढळते.काही शिव मंदिरात ती चतुर्भूज "ललिता" या स्वरूपातही आढळून येते.सुवर्णासारखी झळाळणारी "पीत" कांती असलेली शांत स्वभावाची पार्वती "गौरी" म्हणून ओळखली जात असली तरी त्याला विरोधाभास असलेली रौद्र स्वरूप धारण करणारी कृष्णवर्णाची पार्वती "काली(शामा)" म्हणून ओळखली जाते. रूग्वेदात "रूद्राणी" म्हणून ओळखली जाणारी पार्वती सायनाचार्य यांच्या अनुवक व केन या उपनिषद धर्मग्रंथात "उमा(अंबिका)" म्हणून ओळखली जाते.तिच्याकडे ब्रह्मदेवाची शक्ती व वैदिक ज्ञान अग्नि,वायू व वरूण यांना प्रदान करणारी देवता म्हणून पाहिले आहे.

अनेक शिवमंदिरात पार्वतीचे दर्शन विविध स्वरूपात होते.त्यातील "हस्तमुद्रा" समजून घेण्यासारख्या आहेत.हाताची व बोटांची मुद्रा कंसात दाखविलेले भाव प्रकट करते कटक/कटीअवलंबिता/कटीसंस्थिता म्हणजे कटेवर दोन हात(आश्चर्य),अभया/हिरन(कौतुक व अभय),तर्जनी(विनाश),चंद्रकला(बुध्दिमत्ता),वरदा(इच्छापूर्ती)इ.

"पार्वतीमुद्रा" या भारतीय नृत्यकलेत पार्वतीच्या या सर्व सोळा प्रकारच्या"मुद्रा" शिकविल्या जातात."अभिनय दर्पण" या गंथात त्यांचे वर्णन "देव हस्त" असे केलेले आढळते.नर्तकीने कमरेवर दोन्ही हात "अर्धचंद्राकृती" ठेवल्यास तो पार्वतीचा "गौरी(सृजन) व काली (संहारक)" असा दुहेरी अवतार" समजला जातो. संहारक अवतारातील वाघ किंवा सिंहावर आरूढ झालेली अष्टभुजा किंवा दशभुजा,नरमुंडमाला परिधान केलेली पार्वती "काली" या नावाने ओळखली जाते.तर कामाक्षी व मीनाक्षी या कल्याणकारी अवतारात पार्वतीच्या उजव्या खांद्यावर प्रेम,मधुर भाषण,बीज,संयोग व सृजन यांचा प्रतीक असलेला पोपट स्वरूपातील "कामदेव" आढळून येतो. तर माथ्यावर शिवाचे प्रतिनिधित्व करणारा "चंद्रमा" विलसत असतो. दक्षिण भारतात अशी आख्यायिका आहे की द्यूतात आपले व्याघ्रांबर हरलेल्या शिवाने पार्वतीचे रूपांतर पोपटात केले.या अवतारात ती "मीनाक्षी" म्हणून ओळखली जाऊ लागली.

भारतीय तत्वज्ञानात पार्वती या जगन्मातेचे शक्ती,सृजनाचे तसेच संहाराचे,कल्याणाचे तसेच विनाशाचे,स्वातंत्र्य तसेच शक्तीचे, कार्यसिध्दीसाठी उद्दिष्ट देणारे व त्याच्या प्राप्तीसाठी आशिर्वाद देणारे, अनिष्ट गोष्टींना विरोध करण्याची शक्ती देणारे,न्याय प्रस्थापित करणारे,अन्न पुरवणारे असे वर्णन केलेले आढळते.मानवी स्त्री असून सुध्दा तपश्चर्येच्या बळावर शंकराला प्राप्त करून घेणारी पार्वती म्हणूनच "शक्तीची देवता" समजली जाते व जगभर तिचे विविध रूपात पूजन केले जाते.कधी ती अन्न देणारी "अन्नपूर्णा" असते तर कधी संहार करणारी "महाकालीमाता" असते.दारूक या दैत्याला संपविण्यासाठी तीने पिंजारलेले केस,वासलेला जबडा व बाहेर काढलेली लांबलचक जीभ असा रूद्रावतार धारण केलेली दिसतो. या अवतारात तिला शांत करण्यासाठी साक्षात शिवाला देखील बालक स्वरूप धारण करून रडावे भेकावे लागले होते.तर महिषाचे रूप धारण केलेल्या "दुर्ग" या दैत्याचा वध करण्यासाठी तिला "महिषासुरमर्दिनी" चा रौद्र अवतार धारण करावा लागला होता. त्यामुळे या अवतारातील पार्वती उत्तर भारतात "भद्रकाली" तर दक्षिण भारतात "महाकाली" म्हणून पूजिली जाते.निर्गुण निराकार अशी तामसी वृत्तीची ही शक्ती "परब्रह्माचे स्त्री स्वरूप" म्हणून ओळखले जाते व त्रिदेवींची एक घटक देवता या नात्याने "आदीशक्ती" म्हणून ओळखली जाते. प्रत्येक देवामधे ही "आदीशक्ती" वास करीत असते व तिला "सप्त मातृका(ब्राह्मणी, वैष्णवी,माहेश्वरी, इंद्राणी,वराही,कौमारी,चामुंडा म्हणून ओळखले जाते.तर नरसिंही/प्रत्यंगिरा/वरूणी/यमी अवतार हा "आठवा अवतार" समजला जातो.काही इतिहासकार विनायकी व त्रिपुरसुंदरी यांना देखील "अतिरिक्त सप्त मातृका" असे संबोधतात.तंत्र विद्येतील "विद्या संप्रदाय" देखील या "आदीशक्तीं" चे पूजन करतो.तर काही ठिकाणी अरूणासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी धारण केलेल्या सहा पायांच्या मधुमाशीच्या रूपात "ब्रह्माणी" या रूपात "आदीशक्ती" चे पूजन केले जाते.तर "विंध्य वासिनी" या नावाने पूजिली जाणारी "आदीशक्ती" ही कृष्णाचे संरक्षण करण्यासाठी नंद व यशोदेच्या पोटी नंदादेवी(एकनाशना,योगमाया,विष्णूमाया) या नावाने जन्माला आलेली "आदीशक्ती समजतात.चंडिका(कौशिकी) हे आदीशक्तीचे महाकालीस्वरूप तर तीन स्तनधारी,मत्स्यासारखे नेत्र असणारी मदुराईची मीनाक्षी,कमलासारखे नेत्र असणारी कमलाक्षी, वाराणसीची विशालाक्षी,समुद्रकिनारीची अखिलंदेश्वरी,काशी विश्वेवराची पत्नी अन्नपूर्णा,बाणासूराचा वध करण्यासाठी कुमारिकेचा अवतार धारण केलेली कन्याकुमारी,वेद जाणणारी गायत्री,रजोगुणाची धन देणारी महालक्ष्मी(अष्टलक्ष्मी,अंबाबाई, इच्छाशक्ती),ब्रह्मदेवाची पत्नी काश्मिरची महासरस्वती,श्रृंगेरीची शारदा,बसर्‍याची श्रीविद्या सरस्वती ही सगळी "आदीशक्ती" चीच रूपे आहेत.

उत्तर भारतात वास्तव्याला असताना "वैष्णव" पंथीय असलेला लाड सका(शाखीय) वाणी समाज दक्षिण भारतात वास्तव्याला असताना "शाक्त" पंथाकडे कसा वळाला हा मोठा अभ्यासाचा विषय आहे.त्या संदर्भात धर्मशास्त्र व मनोविज्ञानाचे अभ्यासक Dr.Kinsley यांनी

इ.स.पू.४०० ते इ.स.४०० ते या काळातील भारतीय धर्मग्रंथांचा (रामायण,महाभारत,पुराणे इ.) अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की रूग्वेदात वर्णन केलेली "रूद्राणी" म्हणजेच उपनिषदांमधील "उमा(अंबिका)" ! त्या नंतरच्या म्हणजे महाकवी कालिदासाच्या काळात "पार्वती" ही भारतातील "स्थानिक गिरीजनां" ची देवता म्हणून उदयाला आली.Hopkins या अभ्यासकाच्या मते हंस उपनिषद काळापासून पार्वती ही "स्थानिक गिरीजनांची देवता" म्हणून ओळखली जाऊ लागली.Weber या अभ्यासकाच्या मते शिव हे वैदिक देवता रूद्र व अग्नी यांचा अवतार आहे तर पार्वती हा उमा(अंबिका) यांचा अवतार आहे.Tate या अभ्यासकाच्या मते "शक्ती" चे प्रतीक असलेल्या शिवलिंगातील योनी हे "पार्वती" व लिंग हे "शिव" यांचे प्रतीक आहे.शिवलिंग हे स्त्री पुरूष "परस्परावलंबी" असल्याचे व "सृजनाच्या शक्तीचा स्त्रोत" असल्याचे प्रतीक आहे.या संदर्थात डाॅ.रां.चि.ढेरे यांचे संशोधन वाचण्यासारखे आहे.या काळात लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांनी दक्षिण भारतातील स्त्रिया व त्यांच्या धार्मिक संकल्पंनांचा मुक्तहस्ते स्वीकार केल्याचे दिसून येते.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page