BJMC-1973 बॅच मधील अनेक ज्ञात व अज्ञात "सुदामा-श्रीकृष्ण जोड्या"
- Aug 10, 2021
- 1 min read
BJMC-1973 बॅच मधील अनेक ज्ञात व अज्ञात "सुदामा-श्रीकृष्ण जोड्या"
वैयक्तिक संपर्कातून पूरग्रस्त जनकल्याण रक्तपेढी,महाड साठी "निधी संकलन" करताना आपल्या बॅच मधील अनेक "अज्ञात सुदामा" व अनेक "अज्ञात श्रीकृष्ण" यांचा परीचय झाला.त्या सर्वांना त्रिवार वंदन !
मला ज्ञात झालेली उदाहरणे सांगतो.आपल्या गटाचे व्यवस्थापक संजीव खुर्द ! याने काही अंशी श्रीकृष्ण व बव्हंशी सुदामा बनून लायन्स क्लबच्या वतीने ट्रक भरभरून अन्न,धान्य व वस्त्रे पूरग्रस्त कोकणवासियांसाठी धाडून दिलेली आहेत हे सांगताना ऊर अभिमानाने भरून येतो.
असाच अनुभव प्रकाश फडणीसशी बोलताना आला.मी जनकल्याण रक्तपेढी,महाड या पूरग्रस्त रक्तपेढीसाठी काही मदत मागण्या आधीच त्याने पूरग्रस्त कोकणवासियांसाठी मोठी मदत जनकल्याण समितीकडे आधीच पाठवुन दिली होती.
तिसरे उदाहरण प्रकाश चिरमाडेचे ! कोणी काही मदत मागण्या आधीच त्यांची मोठी आर्थिक मदत रोखीने जनकल्याण रक्तपेढी,महाड पासून जेमतेम १५ कि.मी.अंतरावरील दरडग्रस्त "तळीये" या खेड्यात थेट जाऊन पोहोचली देखील होती.
धन्य ते सुदामा आणि धन्य ते श्रीकृष्ण !
Comments