top of page

"National Museum" नैरोबी, केनया,आफ्रिका

  • dileepbw
  • Aug 30, 2023
  • 2 min read

नुकताच नैरोबी,केनया,आफ्रिका येथील "National Museum" ला भेट देण्याचा योग आला.

संपूर्ण जगातील पहिला मानव चिंपँझी पासून आफ्रिकेमधेच निर्माण झाला व तेथून तो जगभर विखुरला असे अधुनिक विज्ञानाने आता मान्य केले आहे.त्यामुळे आतापर्यंत लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा "सका/शक/Scythian" वंशाचा पूर्वज जो मध्य आशियातील असावा असे मानले जात होते त्या कल्पनेला छेद द्यावा लागणार आहे.तो आफ्रिकेमधून मध्य आशियात स्थलांतरित झाला असे आता अधुनिक विज्ञान मानते.

"Nairobi National Museum" मध्ये या संकल्पनेचे असंख्य पुरावे पहायला मिळाले.हे मी माझे भाग्यच समजतो.

"Nairobi National Museum,Museum Hill, near Uhuru Highway, between Central Business District and Westlands in Nairobi" येथे मानवाची निर्मिती कशी झाली याचे संशोधन करण्यासाठी "Heritage Research, Palaeontology, Ethnography, Biodiversity Research असे अनेक विभाग कार्यरत आहेत.

इ.स.१९१० साली आफ्रिकन वन्य व जनजीवनाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी "East Africa Natural History Society (E.A.N.H.S.)" या संस्थेने "The National Museum of Kenya(NMK)" ची स्थापना केली.इ.स.१९११ साली श्री.अलादिन विसराम व इ.स.१९१४ साली श्री.अॉर्थर लव्हरिज या म्युझियम क्युरेटर्सनी आपल्या अथक परिश्रमाने "Coryndon Museum" उभारणी केली.दि.२२ सप्टेंबर,१९३० रोजी हे संग्रहालय आम जनतेसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर "Herbarium on East African plants" ची उभारणी करण्यात आली.इ.स.१९६१ साली "Centre for Prehistory and Paleontology" उभारण्यात आले.इ.स.१९६३ साली "National Museum of Kenya" स्वतंत्रपणे आपला कारभार पाहू लागले व इ.स.१९६४ पासून "Coryndon Museum" हे "National Museum" म्हणून ओळखले जाऊ लागले.त्यामध्ये "Gallery of Kenyan Ethnic Communities" उभारण्यात आली.पुढे "Nairobi Snake Park,Botanic Garden व Nature trail" देखील उभारण्यात आले.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांचा अभ्यास सुरू असल्याने मला सर्वात आवडलेला विभाग म्हणजे श्री.लुई लिके या ब्रिटीश पुरातत्वशास्त्रज्ञाने उभारलेला "मानवी उत्क्रांती" हा विभाग ! या विभागात मला "सका/शक/Scythian" वंशाचे लोक कसे निर्माण झाले ते क्रमाक्रमाने पहायला मिळाले.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाचा इतिहास संकलित करताना त्याचा निश्चितच मोठा उपयोग होईल.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page