The more you sweat during peace time,the less you bleed during war time
- dileepbw
- Aug 7, 2021
- 1 min read
"The more you sweat during peace time,the less you bleed during war time"
"The more you sweat during peace time,the less you bleed during war time" हे तत्व माहीत असल्याने जनकल्याण रक्तपेढी,महाड तेथील मुस्लिम बांधवांवर क्षणात कोसळलेल्या आपत्तीवर कशी मात करू शकली याचा "आँखोका देखा हाल" सांगतो.
"नूँर मंझील" ही महाड मधील मुस्लिम बांधवांची वसती असलेली पाच मजली इमारत गेल्या वर्षी एका रात्री पत्त्याच्या बंगल्यासारखी धाडकन भुईसपाट झाली.सर्वत्र हाहा:कार माजला.पण जनकल्याण रक्तपेढी,महाडने आपला संयम सोडला नाही व आपली कामगिरी चोखपणे बजावायला मध्यरात्रीच सुरूवात केली.They had sweat during peace time ! शांततेच्या काळात समस्त महाडकरांच्या रक्तगटवार व विभागवार याद्या या रक्तपेढीने करून ठेवलेल्या असल्याने सर्वांना मोबाईलवर रक्तदानासाठी धाव घेण्याचे आवाहन केले गेले.सेवा,संपर्क,सातत्य व शिस्त या चतु:सुत्रीवर कार्यरत असलेल्या जनकल्याण रक्तपेढी,महाड येथे एक दोन नाही तर तब्बल ६४ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्त रक्तदानासाठी धाव घेतली.
आपत्तीग्रस्तांमधे एक जण B Negative या दुर्मिळ रक्तगटाचा रूग्ण होता.त्याला देखील तातडीने B Negative चे सहा युनिट रक्त पुरविण्यात आले व त्याचे प्राण वाचले.संबंधित रूग्णालयाला देखील खूपच आश्चर्य वाटले.
या प्रसंगामुळे महाडचे मुस्लिम बांधव जनकल्याण रक्तपेढी,महाडशी कायमचे जोडले गेले आहेत.दरवर्षी मुस्लिम बांधव चार रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. त्यात ७०-७५ युनाटस् रक्त संकलित गेले जाते.जनकल्याण रक्तपेढी,महाडचे एक संचालक फिजिशियन डाॅ.फैजल देशमुख हे निधी संकलनाच्या बाबतीत अत्यंत उत्साही ! या महापूराच्या आपत्ती नंतर त्यांच्या वरच रूग्णसेवेचा इतका ताण आलेला आहे की त्यांची ही जबाबदारी सध्या तरी आपल्या बॅचमधील वर्गमित्रांनी उचलावी व आपल्या महाड मधील परिचितांना मदतीचे आवाहन करावे.ही नम्र विनंती.
या प्रसंगाचे अधिक वृत्त खालील संकेतस्थळावर आजही उपलब्ध आहे.
https://www.google.com/url?sa=t&source=web&rct=j&url=http://gallinews.com/News_all/taging/AT&ved=2ahUKEwi7pp3lg57yAhVk63MBHTWmBqMQFnoECAsQAg&usg=AOvVaw1wl3Vg3UK4-qMVRZsBSOnW
Comments