top of page

निलगिरी

  • Dec 27, 2022
  • 4 min read

"निलगिरी/युकॅलिप्टस/मॅग्नोलियोप्सिडा मिर्टाकी"

बीना मेहताने "रेड सी" चे फोटो पाठवताच मी तांबडा,काळा, पिवळा व पांढर्‍या समुद्रांचा अभ्यास करून त्या त्या रंगांमागची शास्त्रीय कारणे सांगीतली होती. समुद्राचे पाणी "निळे" का असते याचे कारण सांगताना ‘Rayleigh scattering’ हा भौतिक विज्ञानातला नियम सांगीतला होता. आठवतो ना ?

आज माझा पुतण्या त्याच्या आई-वडीलांना घेऊन

"Royal Botanic Gardens, Cranbourne" येथे पर्यटनासाठी गेला आहे.तेथील "निलगिरी/युकॅलिप्टस/मॅग्नोलियोप्सिडा मिर्टाकी" वृक्ष पाहून मला मी पाहिलेले सिडनीचे "कुरांडा फाॅरेस्ट" व तेथील "निलगिरी(Blue Monutain)" आठवला. तो संजीव बक्षीने बरोबर ओळखला.पण त्याला "Blue" रंग का येतो ? कोण सांगू शकेल ? भारतात कुठे दिसते अशी निळाई ?

याला सुध्दा "Rayleigh scattering" हा "Optical phenomenon" च कारणीभूत असतो. निलगिरी वृक्षांमुळे सदोदित दमटपणा असल्याने या जंगलात हे "Rayleigh scatter" सतत घडत असते व सर्वत्र "निळाई" पसरल्याचा आभास होतो.सूर्यप्रकाश जितका प्रखर तितकी

"निळाई" गडद ! आहे की नाही गंमत ?

या कुरांडा फाॅरेस्ट मधे "Gundungurra" नावाचे

Aboriginal रहातात.त्यांच्या Darug, Gundungurra,Dharawal,Darkinjung, Wanaruah व Wiradjuri अशा जमाती आहेत.ते थोडे फार आपल्या "दक्षिण भारतीय" लोकांसारखेच दिसतात.म्हणून मी त्यांचा अभ्यास केला.तो क्रमश: सांगतो.

"Gundungurra" दंतकथांनुसार "Mirigan & Garangatch" या अर्धमत्स्य व अर्धमकर काल्पनिक दैवी प्राण्यांनी सृष्टी निर्माण केली.त्यांचे

बावीस हजार वर्षांपूर्वीचे अवशेष कुरांडा फाॅरेस्टमधे "Red Hands Cave,Wentworth Falls,Queen Elizabeth Drive व Kings Tableland Aboriginal Place" येथे पहायला मिळतात.

अशाच "निलगिरी पर्वतरांगा" भारतात तामिळनाडू, कर्नाटक व केरळ या राज्यात देखील दिसतात. कारण कागद व्यवसायासाठी ब्रिटिशांनी सिडनीमधील निलगिरी वृक्ष उपटून भारतात लावले. या निलगिरी पर्वतरांगात फुललेली "कुरुंजी" ही निळी-जांभळी फुले कुणी कुणी पाहिलेली आहेत ?

भारतात दर १२ वर्षांनी जसा "महाकुंभ" भरतो तसेच एक खास निळे-जांभळे फुल सुद्धा दर १२ वर्षांनी उमलते.केरळच्या या निलगिरी पर्वत रांगा, दर बारा वर्षांनी जगातील एका असाधारण मानल्या जाणाऱ्या "नीलकुरुंजी" या फुलांनी बहरतात व सुरु होतो एक "निळा जांभळा झिम्मा" ! मग हा "नयन सोहळा" पहाण्यासाठी पर्यटकांची एकच "झुंबड" उडते.केरळ मधील प्रसिद्ध आणि नितांतसुंदर हिलस्टेशन "मुन्नार" हे नीलकुरुंजीचे सर्वात मोठे घर मानले जाते. ३ हजार हेक्टर वळणदार पर्वतरांगा असलेले हे खास ठिकाण पर्यटकांचे सुद्धा आवडते ठिकाण आहे. "नीलकुरुंजी" फुलली की मुन्नारचे सौंदर्य आणखी मोहरून येते."मुन्नार" येथे एका वैद्यकीय परिषदे निमित्त माझा तीन दिवस मुक्काम होता.पण तेव्हा "नीलकुरुंजी महोत्सव" पहाण्याचा योग मात्र नव्हता.असो.हा हंत हंत !

केरळच्या जंगलात ३२ चौ.किमीचा परिसर २००६ पासून "कुरुंजी अभयारण्य" म्हणून संरक्षित केला गेला आहे."व्हॅली ऑफ फ्लॉवर्स" नंतर हे दुसरे "फुले अभयारण्य" आहे."मुथूवन" जनजातीचे लोक कुरुंजीला प्रेम आणि रोमांस यांचे प्रतिक मानतात. पारंपारिक कथेनुसार भगवान "मुरुगा" याने शिकाऱ्याची मुलगी "वेली" हिच्याबरोबर लग्न करताना याच फुलांची माळ तिच्या गळ्यात घातली होती. केरळ मध्ये "नीलकुरुंजी" फुलली की राज्याच्या पर्यटनात मोठी वाढ होते असेही सांगतात.आता "निलगिरी जंगला" ची माहिती सांगतो.ऐका.

तामिळनाडूतील प्रसिद्ध असलेल्या ‘उटकमंड’ या थंड हवेच्या पर्यटनस्थळाच्या जवळ काही अंतरावर मेटापालयम रस्त्यावर आकर्षक,देखणं व प्रवाशांना लुभावणारं "कुन्नूर" नावाचं एक ठिकाण आहे. सह्याद्री पर्वताप्रमाणे "निलगिरी(Blue Mountain)" पर्वत लांब,रुंद पसरलेला नसला, तरी बऱ्यापैकी लांब व रुंद असून निसर्गाची भरपूर कृपा लाभलेला असा हा परिसर आहे.कर्नाटक व तामिळनाडू ह्या दोन राज्यांमधील "निलगिरी" हा विभाजक आहे.ह्या पर्वतराजींमधून जाताना "निलगिरीचा(Eucalyptus)" सुवास येत असतो.

या डोंगराळ भागात "तोडा,बदागा,इरूला, कुरूंबा व कोटा" या वन्य जमाती आहेत.त्या ऑस्ट्रेलियन वन्य जमातींसदृश्य असल्याने "Australoid" म्हणून ओळखल्या जातात.या निलगिरी पर्वतावर "निलगिरीची(युकॅलिप्टसची)" खूप झाडे आहेत. वेगवान वाढणारे हे सदाहरित ऑस्ट्रेलॅशियन वृक्ष लाकूड,तेल,डिंक,राळ यासाठी उपयुक्त आहेत. नीलगिरीच्या पानांचे तेल मुख्यतः "औषधी" गुणधर्मांसाठी वापरले जाते.इमारती लाकूड म्हणून त्याला चांगले मूल्य मिळते.कमी पाऊस असलेल्या प्रदेशांतील उंचच्या उंच वाढणारी निलगिरीची झाडे ही फार शुष्क असतात.त्यांची फारशी सावलीही पडत नाही. झाडावर पक्षी घरटी करत नाहीत. त्यांच्या आसपासचे वातावरण फार कोरडे असते. झाडे उगवल्यानंतर फटाफट वाढतात. त्यासाठी ती जमिनीतून प्रचंड प्रमाणात पाणी ओढून घेतात, व विहिरी कोरड्या पडू शकतात.झाडांचे खोड पांढरे असते.त्याच्यापासून फर्निचर बनू शकते.पुमंगात अनेक पुंकेसर असतात.फळ कठीण व लहान करंड्याप्रमाणे असून ते करंड्याप्रमाणे उघडते.बिया लहान व अनेक असतात.

निलगिरीची पाने ही ऑस्ट्रेलियातील "कोआला" या सस्तन प्राण्याचे मुख्य खाद्य आहे.पानांपासून तेल काढतात.या तेलात "यूकॅलिप्टॉल" हे संयुग असते. तेल झोंबणारे (जहाल), कडू, पाचक, वायुनाशी, कफ व वात स्थितीत उपयुक्त असते. ते जंतुरोधक व दुर्गंधीरोधी असून कफ पातळ करण्यासाठी वापरतात. ते श्वासनलिकादाह, न्यूमोनिया व इतर श्वसन संस्थेच्या विकारांवर उपयुक्त असते. मात्र, तेलाचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्यास उलट्या किंवा जुलाब होऊ शकतात.

निलगिरीच्या झाडांना शास्त्रीय दृष्ट्या "युकॅलिप्टस ग्लोब्युलस" असेही म्हणतात. त्याचबरोबर त्यांना " Eucalyptus Melliodora " असेही नाव देण्यात आलेले आहे.या नावाचा अर्थ "वेल कव्हर्ड" म्हणजेच नीट झाकलेला असा होतो.निलगिरीच्या झाडांना इंग्रजीमध्ये "ब्लु गम" किंवा "गम ट्री" या नावाने ही ओळखले जाते.निलगिरीच्या झाडाचे फळ हे आकाराने लहान व कठीण असून ते एखाद्या कारंड्याप्रमाणे उघडणारे असते. निलगिरीची झाड हे उंचच्या उंच वाढलेली असून ती कमी पावसाच्या प्रदेशात जास्त वाढलेली दिसतात. निलगिरीची झाडें एकदा उगवली की ती झापाट्याने वाढतच जातात.निलगिरीच्या झाडांच्या मुळांना पाणी फार लागते त्यामुळे निलगिरीची झाडें ही दलदलीच्या ठिकाणी लावण्यात येतात.या झाडाच्या शेजारचे वातावरण कोरडे असते व ह्याचे खोड हे पांढरे असते.निलगिरीच्या झाडांकडे पाहिले असता ही झाडें फारच शुष्क अशी दिसतात.निलगिरीच्या पानांचा वास खूप छान येतो. या झाडांच्या पानावर मोठ्याप्रमाणात "तेलग्रंथी" असतात म्हणून या झाडाची पाने तेलकट असतात.निलगिरीच्या झाडाच्या पानांपासून तेल काढतात. हे तेल फारच उपयुक्त असते. या तेलात "युकेलिप्टोल" नावाचे एक संयुग असते. हे तेल जंतूनाशक असते.निलगिरीच्या झाडाची पाने तेलकट असल्यामुळे परिणामी काही वेळा जेव्हा जंगलात वणवे लागतात त्या वेळी ही झाडें आग झपाट्याने पसरवित जातात.मी काही वर्षांपूर्वी सिडनी येथे पाहिलेले निलगिरीचे "कुरांडा फाॅरेस्ट" हे घनदाट जंगल वणव्यात संपूर्णपणे भस्मसात झाले आहे.

आपल्याकडे निलगिरीची साधारणपणे हिरवट पांढरी फ़ुले येणारीच जात दिसते.पण ऑस्ट्रेलियात मात्र सुंदर गुलाबी फ़ुले येणारीही जात आहे. निलगिरीच्या कळ्यांवर शंकूसारख्या आकाराचे एक आवरण असते.या झाडाला फ़ुले यायला लागली कि झाडाखाली या टोप्यांचा सडा पडलेला असतो.या टोप्या म्हणजे या कुळाचे मुख्य लक्षण आहे.थोडीशी वेगळी फ़ुले येणारी ही जात.यात जी बोंडे दिसतात त्याची पुढे छोटीशी फळे होतात. जेमतेम अर्धा सेमी व्यासाची वाटाण्यासारखी फ़ळे होतात.वरती पाच ते आठ पाकळ्यांच्या कमळासारखे कोरीवकाम असते, आनि बुडाशी पिटुकला देठ.चुटकीत हा देठ फ़िरवुन जर हे फ़ळ खाली सोडले तर भोवर्‍यासारखे बराच वेळ फ़िरत राहते.

निलगिरी या झाडाबरोबर आपल्याला "निलगिरीचे तेल" आठवते.याच्या पानावर मोठ्या प्रमाणात तेलग्रंथी असतात.हे तेल थोड्या प्रमाणात जंतुनाशक असले तरी जास्त प्रमाणात पोटात गेल्यास विषारीही आहे. साधारणपणे सर्दी झालेली असली कि याचा वास आपल्याला सुखावह वाटतो, सर्दीवरच्या अनेक मलमात वासासाठी ते वापरलेले असते पण त्याचा थेट औषध म्हणुन तितकाचा उपयोग होत नाही.साधारणपणे माकडे वगैरे या झाडाची पाने खात नाहीत, पण "कुआला बेअर" मात्र या झाडाचा पाला आवडीने खाते. याच्या फ़ुलातला मध खायला काही किटक आणि मधमाश्या येत असतात.या झाडाची विविध कारणासाठी आता जगभर लागवड झालीय. सरळसोट वाढणारे खोड म्हणुन लाकडाला मागणी आहे तसेच यापासुन "कागद उद्योगा" साठी कच्चा माल मिळतो. या झाडाचा कोळसाही चांगला होतो. पण या झाडाची पाण्याची गरज जास्त असते. या झाडांमुळे भूपृष्ठाखालच्या पाण्याची पातळी खाली जाते. खरे तर जिथे अशी पातळे खाली जाणे आणि पर्यायाने जमिनीचे क्षारीकरण थांबवणे गरजेचे असते, तिथे याची लागवड केली जाते.

आपल्याकडे एकेका झाडाची साथ येते.या झाडापासून काही रंग मिळवता येतात.पिवळ्या पासून तपकिरी पर्यंतच्या छटा त्यात असतात आणि कापड रंगवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

या झाडाचे खोडही कायम असे बेंगरुळ.काही झाडांचे खोड मुलायम असते खरे पण साल सारखी सुटुन येत असते. अधुनमधुन गाठी येतात, आणि मग निखळुनहि पडतात.

अशा या "निलगिरी" वृक्षाचा शोध व नामकरण कसे झाले त्याची बंधुराजांनी पाठविलेली माहिती अवश्य वाचा.

 
 
 

Recent Posts

See All
"Oppenheimer - Part २०"

"Oppenheimer - Part २०" काल रात्री जावई सागर,कन्या किर्ती,बंधू सुहास,वहिनी प्रतिभा व पत्नीची वहिनी माधवी असा सहकुटुंब सहपरिवार घरबसल्या...

 
 
 
"आपटा रेल्वे स्टेशन"

"आपटा रेल्वे स्टेशन" माझ्या आयुष्यात "पनवेल-आपटा रेल्वे स्टेशन" ला मनोरंजनाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. अकरावी,पी.डी.व...

 
 
 
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page