मनोती
- dileepbw
- Oct 6, 2022
- 1 min read
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजाच्या,"सका/शक/Scythian" पूर्वजांच्या, महाभारत काळापासून माहित असलेल्या,"ऋषिका" जमातीच्या,"देव" कुलाची माहिती
लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" लोकांचे "नफेखोरी" चे मूळ कारण म्हणजे पेरणीच्या काळात असणारा धान्याचा व बी-बियाण्याचा तुटवडा !
ब्रिटीश लोकांनी दळण-वळणाच्या सुविधांमुळे धान्याचा व बी-बियाण्याचा तुटवडा संपला. इ.स.१८७६-७७ या काळात खानदेशात दुष्काळ पडूनही बाहेरून धान्य आयात झाल्यामुळे धान्याचे भाव वाढले नाहीत.
त्यामुळे लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" लोकांचा "मनोती" सारखा "धान्यावर धान्याचे व्याज" हा व्यवसाय ही अडचणीत आला.
सुरत,खंबायत व भडोच ही गुजरातमधील आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रे खरे तर लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" मंडळींची महाराष्ट्रामध्ये येण्यापूर्वीची मूळ गावे होती. ब्रिटीश सुधारणांमुळे प्राप्त झालेल्या या परिस्थितीमध्ये "देवां" नी किरकोळ स्थानिक व्यापारामधून व किरकोळ सावकारीमधून बाहेर पडून मारवाडी, जैन, बोहरा, पारशी, भाटीया, पंजाबी,
कच्छी मेमन अशा अन्य व्यापारी समाजांसारखा आंतरराष्ट्रीयस्तरावर व्यापार सुरु केला असता तर आज लाड सका(लाड शाखीय) वाणी समाजातील "देव" मंडळीं अधिक धनवान झालेली दिसली असती.
आपला कृपाभिलाषी,
प्रा.डॉ.दिलीप बाळकृष्ण वाणी(देव,भडगावकर)
Email I.D. - medicarelabs@gmail.com
भ्रमणदूरभाष :- ९८२३२३०४६६




Comments