top of page

"Consanginous Marriages"

  • dileepbw
  • Sep 6, 2022
  • 2 min read

अनुवांशिक विकार टाळण्यासाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका" वंशाच्या पूर्वजांनी केवळ काळजीपूर्वक निरीक्षणांवर आधारलेली "गोत्र" ही वैदिक संकल्पना मांडली व सगोत्री विवाह टाळावे असा सल्ला दिला.

अधुनिक जनुकशास्त्र देखील "Genetic Stock" हीच संकल्पना मांडते व "नात्यातील विवाह (Consanginous Marriages)" टाळावे असाच सल्ला देते.

थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्त विकाराचा प्रसार टाळण्यासाठी दोन वाहकांनी परस्परांशी विवाह टाळणे हे या संकल्पनेचे उत्तम उदाहरण आहे.

"धर्मसिंधू" या ग्रंथामध्य या "गोत्रां" चे वर्णन खालील प्रमाणे दिले आहे:-

'तत्र गोत्र लक्षणम् - विश्वामित्रो जमदग्निर्भरद्वाजो तथा गौतमः ।

अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ॥

विश्वामित्र,जमदग्नि,भरद्वाज,गौतम,अत्रि, वसिष्ठ आणि कश्यप हे सात ऋषी आहेत व विंध्य पर्वत ओलांडून दक्षिण भारतात स्थलांतरित झालेले "अगस्त्य" हे आठवे ऋषी होत.

यापैकी प्रत्येक ऋषींची अपत्ये म्हणजे त्यांच्या नावाने ओळखले जाणारे "गोत्र" !

प्रमुख गोत्रे व त्यांची प्रवरे खालील प्रमाणे आहेत:-

१ अत्रि : आत्रेय -आर्चासन -श्यावाश्व

२ अघमर्षण : वैश्वामित्र -अघमर्षण-कौशिक

३ आंगिरस : आंगिरस -आंबरीष -यौवनाश्व

४ आयास्य : आंगिरस -आयास्य -गौतम

५ आर्ष्टिषेण : भार्गव - च्यावन -आप्न्वन - आर्ष्टिषेण -

अनूप

६ उपमन्यु : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु

७ कण्व : आंगिरस -आजमीढ -कण्व

८ कपि : आंगिरस -आमहीयव -औरुक्षयस

९ काश्य्प : काश्य्प -अवत्सार -नैधृव( काश्य्प) -अव्त्सार -

असित

१० कुत्स : आंगिरस -माधांत्र -कौत्स

११ कौंडिण्य : वासिष्ठ -मैत्रावरुण -कौंडिण्य

१२ कौशिक : वैश्वामित्र --अघमर्षण -कौशिक

१३ गार्ग्य : आंगिरस -शैन्य -गार्ग्य

१४ जामदग्न्य : भार्गव - च्यावन -आप्न्वन -और्व - जामदग्न्य

१५ नित्युन्द : आंगिरस - पौरुकुत्स्य-त्रासदस्यु

१६ नैध्रुव : काश्य्प -अव्त्सार - नैध्रुव

१७ पाराशर :वासिष्ठ -शाक्त्य -पाराशर

१८ बादरायण : आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु

१९ बाभ्र्व्य : वैश्वामित्र -देवरात -औदास

२० बिद : भार्गव - च्यावन -आप्न्वन-और्व - बिद

२१ भारव्दाज : आंगिरस बार्हस्पत्य -भारव्दाज

२२मित्रायु : भार्गव - च्यावन -देवोदास

२३ मुद्ग् गल : आंगिरस -भार्ग्याश्व -मौद्ग्गल्य

२४ यस्क : भार्गव वैतहव्य -सावेतस

२५ रथीतर :आंगिरस -वैरुप -रथीतर

२६ वत्स : भार्गव - च्यावन -आप्न्वन-और्व -जामदग्न्य

२७ वासिष्ठ : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु

२८ विष्णुवृद्ध :आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु

२९ वैश्वामित्र : वैश्वामित्र -अघमर्षण -कौशिक

३० शांडिल्य : शांडिल्य -असित -देवल

३१ शालाक्ष : वैश्वामित्र -शालंकालय -कौशिक

३२ शौनक : भार्गव -शौनहोत्र -गार्स्तमद.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - ६२२१)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page