top of page

Lake Naivasha,Nakuru,Kenya

  • dileepbw
  • Feb 3, 2022
  • 1 min read

The Sheldrick Wildlife Trust व Kenya Wildlife Service यांनी संयुक्तविद्यमाने चालविलेल्या "हत्ती व जिराफ संगोपन केंद्र" या केंद्राला भेट दिल्यानंतर आमचा प्रवास आफ्रिचा खंडातील केनिया या देशातील Nakuru

या प्रांतातून सुरू झाला.९ जणांची दणकट,वरती उघडणारे टप असलेली सफारी गाडी जो पर्यंत हायवे वरून पळत होती तेव्हा आपली "खरी कमाल" दाखवत नव्हती. आमच्या गप्पा-टप्पा,गाण्याच्या भेंड्या,गावाच्या नावांच्या भेंड्या,बालीवूडच्या भेंड्या,मधूनच पोटोबाचा कार्यक्रम असा मजेत चालला होता.पण हायवे सोडून गाडी जशी जंगलात शिरली तशी अंग चहूबाजूंनी ठेचकाळू लागले. काही ठिकाणी तर ३०-४० अंशाची चढण लागली.पाण्याने भरलेल्या नदी नाल्यांमधून गाडी जायची तशी हळुहळू भीती वाटू लागली होती.एकदाचे Lake Naivasha येथील हाॅटेल गाठले व जीव भांड्यात पडला.चांगलेच अंगमर्दन झालेले असल्याने तीन-चार पेग लावण्यास पर्यायच नव्हता.स्टार हाॅटेल असल्याने जेवण काँटिनेंटलच होते. पण काही "निवडक आफ्रिकन पदार्थ" बाजूच्या टेबलवर मांडलेले दिसले.हरिण,मगर,सुसर,झेब्रा अशी चित्र-विचित्र नावे व चित्रे लावलेली दिसली.मी एकटाच हळुच तिकडे जाऊन प्रत्येकातला एक एक तुकडा घेऊन आलो व कोपर्‍यात बसून त्याच्यावर ताव मारला.एकाही बाईला पत्ता लागू दिला नाही.


दुसर्‍या दिवशी पहाटे उठून सर्वांनी २५ कि.मी.व्यासाच्या Lake Naivasha चा फेरफटका मारला.Naivasha म्हणजे मसाई भाषेत "रफ वाॅटर" ! त्यात अधून मधून वादळे उद्भवतात म्हणे ! पण आमच्या फेरफटक्याच्या वेळी पाणीच काय पण पाणी प्यायला आलेले पाणघोडे,हत्ती, गेंडे,गवे,सिंह,रानडुकरे,चित्ते,बिबटे,लकडबग्गा(तरस) असे हिंस्त्र व झेब्रा,वाईल्ड बीस्ट,जिराफ,हरीण,काळवीट,ससे, माकडे, कोल्हे इ.अहिंस्त्र प्राणी सुध्दा एकदम शांत होते. असे एकूण ४०० हुन जास्त प्रकारचे पक्षी व ३०० हुन जास्त प्रकारचे प्राणी पाणी प्यायला या तळ्यावर येतात. आजूबाजूला जशी मानवी वस्ती वाढू लागली आहे तसे हे तळे देखील आता प्रदुषित होऊ लागले आहे.

Recent Posts

See All
"मृगागड किल्ला, ता.सुधागड,जि.रायगड"

"मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" आपला वर्गमित्र बापू घोडके यांने नुकताच "मृगागड किल्ला,ता.सुधागड,जि.रायगड" हा आपल्या सुवर्ण महोत्सवी...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page