"Manjit's Manjinopathy"
- dileepbw
- Sep 3, 2023
- 1 min read
"Manjit's Manjinopathy"
©दिलीप वाणी,पुणे
मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.
शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" यात "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" हे खरे तर उदयच्या "आलापाच्या कोड्या" मुळे घडले आहे.आता शेवटचे काही आलापच बाकी आहेत.ते आज सांगेन.त्यानंतर मनजीतने सांगीतल्याप्रमाणे "माथाफोड" करून संगीताचा "शास्त्रशुध्द अभ्यास"(chords and scales) करेन.
"Manjit's Manjinopathy" चे Victim बनलेल्या पक्या,जया,इकबाल,शांताराम,टोपी, उदय, दीप्या यांनी "शाम" या विषयावरची गाणी ऐकताना त्याचा जरूर आस्वाद घ्यावा.




Comments