top of page

"Manjit's Manjinopathy - प्यारकी मंझिल"

  • dileepbw
  • Sep 3, 2023
  • 2 min read

"Manjit's Manjinopathy - प्यारकी मंझिल"

©दिलीप वाणी,पुणे

मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" यात "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" हे खरे तर कालच्या टोपीच्या "आलापाच्या कोड्या" मुळे घडले आहे. गटावरील भलेभले संगीतप्रेमी थकले पण उदयसकट एकालाही हेमंतकुमार व गीता दत्तचे हे आलाप ओळखू आले नाही.माझ्या सारख्या नवशिक्याने कसे बरे ओळखले असावे ?

कारण मनजीतने सांगीतल्याप्रमाणे मी "माथाफोड" करून संगीताचा "शास्त्रशुध्द अभ्यास"(chords and scales) करतो.या "गुम सूम सा ये जहां ये रात ये हवा" या गाण्याबद्दल नंतर लिहितो.आधी "Manjit's Manjinopathy - प्यारकी मंझिल" बद्दल लिहितो.

काल सगळे झोपल्यावर Manjit's Manjinopathy अचानक "मंझिल" या शब्दाकडे वळाली.उदय,इकबाल,टोपी इ.जाणकारांनी त्यांना जो पटला तो "मंझिल" या शब्दाचा अर्थ सांगीतला. मी रीतसर अभ्यास करून "मंझिल" या शब्दाचे डझनभर अर्थ शोधून काढले.त्याने आरती उचकली व तिने मला चक्क फडणवीसबाबासारखे "नापास" करून टाकले.बहुमत मिळविले ते काय मी पाप केले काय ? मी पुन्हा येईन !

मध्यरात्रीच्या ठोक्याला सरदारजीला "मंझिल" या शब्दाचा "प्यारकी मंझिल" या शब्दसमूहातील मंझिल म्हणजे "शादी व बच्चे" असा अर्थबोध झाला व त्याच्यातला तत्ववेत्ता जागा झाला.मग त्याने "मंझिल" या शब्दाची "मन+झील" अशी फोड करून चर्चा "शादी व बच्चे" या ब्रह्मदेवाच्या कार्याकडून "मनाच्या विशालते" कडे नेली. तिथपर्यंत ठीक होते.मग "मन+झील" मधील "झील" या शब्दावरून त्याला अचानक "Zeil Neelsen staining" आठवले व त्यातील AFB प्रमाणे त्याला सर्वत्र "प्यारका कीडा" दिसू लागला व त्याने एक अजब तत्वज्ञान सांगीतले.ऐका परत एकदा !

"All bacteria/viruses/parasites in our gut control our health and emotions.

Gut organisms affect gut serotonin, vasopressin,other gut neurohormones. Gut organisms thus affect our mood."

खरे काय अन खोटे काय ते परमेश्वरच जाणे.पण All diseases are produced by germs (Allos+Pathos) या Theory नुसार "प्रेमरोगाचा जंतू" च असावा.काय वाटते तुम्हाला ?

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page