"Manjit's Manjinopathy - "संगीत संकल्पना"
- dileepbw
- Sep 3, 2023
- 2 min read
"Manjit's Manjinopathy - "संगीत संकल्पना"
©दिलीप वाणी,पुणे
मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम गीतांना इतके दिवस मनातल्या मनात "दाद" देणारे आता चक्क संगीतावर भाष्य करू लागले आहेत.ही आनंदाची गोष्ट आहे.
शांतारामने कवितेत म्हटल्याप्रमाणे "दिलकी खिचडी पकाये मंजीत दिलवाला" या खिचडीत "साधू वाणी डाले पानी और मिर्च मसाला" हे खरे तर उदयच्या "आलापाच्या कोड्या" मुळे घडले आहे.आता शेवटचे काही आलापच बाकी आहेत.ते आज सांगेन.त्यानंतर मनजीतने सांगीतल्याप्रमाणे "माथाफोड" करून संगीताचा "शास्त्रशुध्द अभ्यास"(chords and scales) करेन. "Manjit's Manjinopathy" चे Victim बनलेल्या पक्या,जया,इकबाल,शांताराम,टोपी, उदय,दीप्या यांनी "शाम" या विषयावरची गाणी ऐकताना त्याचा जरूर आस्वाद घ्यावा.आज संगीतातील महत्वाच्या संकल्पनांची माहिती सांगतो.या सर्व संकल्पना या संगीत क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या आहेत."डिप्रेशन" मध्ये गेलेल्या व्यक्तीला त्या तनावातून फक्त संगीत बाहेर काढु शकते.एवढी ही स्वरांची जादू आहे.म्हणूनच संगीत हे भंगलेल्या हृदयाचे औषध आहे असे म्हणतात.
"संगीत संकल्पना"
नवजात बालकाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्मताच त्याच्या तोंडातुंन "कुई कुई" असा आवाज बाहेर पडतो तेव्हा तो काळजाचा ठाव घेणारा आवाज देखील एक सुखद आणि आनंदाचा ध्वनि निर्माण करतो.म्हणजेच जन्मजात "सुर" आपल्या साथीला असतात. ते संगीत आपल्यासोबतच जन्म घेतं. संगीताविना एखादी व्यक्ति जगु शकणे अशक्यच आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये संगीताला खुप मोठी प्राचीन परंपरा आहे. संगीत ही अतिप्राचीन कला आहे. गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांना मिळून संगीत असे म्हणतात. संगीत हे सर्वांनी ऐकले पाहिजे. कारण संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते."सुगम संगीत" हा भारतीय संगीताचा प्रकार आहे.जे संगीत निश्चित नियमांनी बाधित नाही त्याचप्रमाणे गायला आणि ऐकायला सोपं जाईल असं संगीत म्हणजे सुगम संगीत.
उदाहरण- लोक गीत, लोकप्रिय संगीत, भजन, फ़िल्मी गीत
संगीत म्हणजे काय?
संगीत माणसाला मानसिक स्वास्थ प्रदान करण्याचे माध्यम आहे. ‘सं’ म्हणजे स्वर, ‘गी’ म्हणजे गीत आणि ‘त’ म्हणजे ताल होय. संगीत कला ही सर्व कलामध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. यामध्ये विविध प्रकार पडतात. उदाहरणार्थ सुगम संगीत, नाट्यसंगीत, भावगीते, भक्तिगीते ,शास्त्रीय संगीत, संगीतातील राग, संगीतविषयक ग्रंथ इत्यादी !
१.स्वर - नियमित कंपन संख्येने युक्त अशा आवाजास स्वर असे म्हणतात.
२.सप्तक - बारा सुरांच्या समुदायाला सप्तक असे म्हणतात.
३.नाद - संगीत उपयोगी ध्वनीस नाद असे म्हणतात.
४.अरोह - स्वरांची चढ़ती रचना म्हणजे अरोह.
५.अवरोह - स्वरांची उतरती रचना म्हणजे अवरोह.
६.पक्कड़ - रागवाचक स्वरसमुहास पक्कड़ असे म्हणतात.
७.वादी - रागातील मुख्य स्वरास वादी असे म्हणतात.
८.संवादी - वादी खालोखाल दुय्यम स्वरास संवादी असे म्हणतात.
९.अनुवादी - वादी आणि संवादीच्या व्यतिरिक्त राहीलेल्या स्वरांना अनुवादी असे म्हणतात.
१०.विवादी - रागामध्ये रंजकता येण्यासाठी ज्या वर्ज्य स्वरांचा उपयोग केला जातो त्याला विवादी असे म्हणतात.
११.सम - तालाच्या पहिल्या मात्र्यास सम म्हणतात.
१२.काल - तालाचे दोन भाग केले असता दुसऱ्या भागाच्या पहिल्या मात्र्यास काल म्हणतात.
१३.आलाप - रागातील स्वर संथ गतिने गाणे म्हणजे आलाप होय.
१४.ताना - रागामध्ये स्वरांचा अविष्कार जलद गतिने करणे म्हणजे ताना होय.
१५.आवर्तन - समेपासून समेपर्यंत गायल्या किंवा वाजविल्या जाणाऱ्या शब्दसमुहास आवर्तन म्हणतात.




Comments