top of page

"Music Therapy - Binaural Beats Part 7"

  • dileepbw
  • Sep 4, 2023
  • 1 min read

"Music Therapy - Binaural Beats Part 7"

©दिलीप वाणी,पुणे

एक गंमत सांगू का ? माझा आठ महिन्याचा नातू "ऋषी अगत्स्य" आतापासूनच "योग" करायला लागला आहे.उदयने सांगीतल्याप्रमाणे त्याला वर्षांचा होईपर्यंत ब्रिटीश आरोग्यसेवेने (NHS-National Health Scheme) "मीठ व साखर" कटाक्षाने वर्ज्य केलेले आहे.त्याच्या बरोब्बर उलट माझ्या लहानपणी मी शंख करायला लागलो की आई माझ्या तोंडात "तिखट,मीठ,साखर" चोपडलेला उकडलेला अख्खा बटाटा कोंबत असे व मी क्षणात शांत होत असे.म्हणूनच मी असा "टबूल" झालो आहे.असो.

आता या "ऋषी अगत्स्य" च्या "योगाभ्यासा" बद्दल सांगतो. "NREM Sleep" प्राप्त व्हावी म्हणून हे "महाराज" काय करत असावेत ? चक्क "Music Therapy" घेतात. गर्भावस्थेत असताना जे "Music" सातत्याने कानावर पडते त्याची CD लावताक्षणी हे "ऋषी महाराज" एका क्षणात "ध्यानस्थ" होतात.आहे की नाही गंमत ?

हे पाहून मला माझी "Music Therapy" वरची लेखमाला आठवली.तुम्हाला आठवते ना ? त्यात मी विविध "Neurotransmitters" चा उल्लेख केला होता.आता नातवाच्या झोपेकडे पाहून "Binaural Beats" चा अभ्यास केला.सांगतो.नसलीला नक्की आवडेल.

Recent Posts

See All
"Manjit's Manjinopathy - "थप्पा"

"Manjit's Manjinopathy - "थप्पा" मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले आहेत.उदयच्या रोजच्या अप्रतिम...

 
 
 
"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत"

"Manjit's Manjinopathy - महाराष्ट्र संगीत" ©दिलीप वाणी,पुणे मनजीत गटावर सक्रीय झाल्यापासून गटावरील सगळेच "संगीतप्रेमी" एकदम जागरूक झाले...

 
 
 
"तसव्वुर-ए-जानाँ"

"तसव्वुर-ए-जानाँ" ©दिलीप वाणी,पुणे उदय,रोहिदास व इकबाल यांनी मिर्जा गालिब यांच्या "बैठे रहें तसव्वुर-ए-जानाँ किये हुए" या शेरची आठवण करून...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page