top of page

Scythian ?Aryans

  • dileepbw
  • Sep 22, 2022
  • 2 min read

मध्य आशियातून भारतात स्थलांतरित झालेल्या लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या पूर्वजांची ओळख समस्त जगाला व्हावी या उद्देशाने Irma Marx या लेखकाने "The Scythians" या नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे.सका/शक/Scythian" लोकांचा मोठा अभ्यास जगभर चालू आहे.रोज नवनवीन माहितीवर प्रकाश पडत आहे.त्यावर समस्त लाड सका (शाखीय) वाणी समाज बांधवांचे लक्ष असले पाहिजे.

मध्य आशियातील सायबेरिया प्रांतात, अल्ताई पर्वत रांगांमधे रहाणार्‍या, इराणी मूळ असलेल्या या "सका/शक/Scythian" टोळ्यांना "Kindred Scythians/ Eastern Scythians) म्हणून ओळखले जाते. हेच महाराष्ट्रातील लाड सका/शाखीय वाणी समाज बांधवांचे पूर्वज आहेत.(संदर्भ - Herodotus)

इराणी मूळ असलेल्या या भटक्या जमातीचे लोक इ.स.पूर्व दुसर्‍या शतकापासून ते पार इ.स.च्या चवथ्या शतकापर्यंत टप्प्याटप्प्याने सायबेरिया प्रांतातून Sogdiana, Bactria, Arachosia, Gandhara, Sindh, Kashmir, Punjab, Haryana, Uttar Pradesh, Bihar, Rajasthan, Gujarat and Maharashtra या क्रमाने उत्तर व पश्चिम भारतात स्थलांतरित झाल्या व "भारतीय शक/Indo-Scythians" म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

Dr.Fahim Naderi या संशोधकाने लिहिलेला "Eastern Iranic People - Bactrians,Saka/Scythians and Tocharians" हा लेख अभ्यासायला मिळाला.त्यात "सका/शक/Scythian" लोकांची खालील माहिती वाचायला मिळाली :-

ग्रीक इतिहासकार Herodotus,Megathenese,Pliny, Ptolemy यांनी असे लिहून ठेवले आहे की जर अनेक टोळ्यांमध्ये विभागलेल्या शूर "सका/शक/Scythian" लोकांना एकत्र बांधणारे नेतृत्व मिळाले असते तर त्यांनी सर्व जगावर राज्य केले असते.

"Airya(आर्य)/सका/स्कुद्रा/स्कूडा/स्कूद्रा अशा विविध नावांनी ओळखले जाणारे हे "सका/शक/Scythian" लोक धनुर्विद्येत अत्यंत पारंगत होते.इ.स.च्या चवथ्या शतकात हूण लोकांच्या आक्रमणांमुळे हे "सका/शक/Scythian" लोक जगात अनेक ठिकाणी(भारत,तुर्कस्तान,युक्रेन,ग्रीस इ.)स्थलांतरित झाले.खैबर खिंडीतून भारतात आलेले "सका/शक/Scythian" लोक पंजाब तर बोलन खिंडीतून भारतात आलेले "सका/शक/Scythian" लोक सिंध,राजस्थान,गुजरात,मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश व महाराष्ट्र येथे स्थलांतरित झाले.Paul Pezon या संशोधकाच्या मते बरेच "सका/शक/Scythian" लोक युरोपमधे (Celts,Germans,Balts Slaves) स्थलांतरित झाले.(उदा.Cimbri ही जर्मन जमात Cimmerians या Scythian जमातीपासून निर्माण झाली आहे).त्यामुळे नाझी जर्मन लोक स्वत:ला "आर्य" समजतात.

या निरक्षर "सका/शक/Scythian" लोकांची Alani ही टोळी पार युरोपात स्थलांतरित झाली.त्यामुळे Pashtu या Scythian भाषेचे Ossetic/Ossetian हे स्वरूप आजही युरोपमध्ये आढळून येते. तसेच जर्मन,फ्रेंच,स्पॅनिश,सॅक्सन,जूट इ.युरोपियन लोकांचे पूर्वज "सका/शक/Scythian" वंशाचे असल्याने त्यांच्या भाषेचे मूळ देखील Scythian भाषेत आढळून येते.

भारतात स्थलांतरित झालेल्या "सका/शक/Scythian" लोकांची या लेखात दिलेली माहिती खालील प्रमाणे :-

इ.स.पू.१००० साली Aryans या नावाने ओळखले जाणारे हे मध्य आशियातील "सका/शक/Scythian" लोक तीन गटात विभागले गेले.एक इराणी गट(Persians,Pushtuns, Balochis,Tajiks, Kurds इ.),दुसरे नुरीस्तानी(Mitanni) व तिसरे भारतीय !

उत्खननात सापडलेली "Bactria-Margiana Archaeological Complex (BMAC)" ही संस्कृती असे दर्शविते की आर्य संस्कृतीचा उदय हा Oxus व Indus या नद्यांच्या खोर्‍यात अफगाणिस्तानात झाला आहे.

लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या "सका/शक/Scythian" वंशाच्या या पूर्वजांचा सुमारे ५०,००० वर्षांचा इतिहास आपण सर्वांनी या अभ्यासगटात वाचलाच असेल. त्यामध्ये हे "सका/शक/Scythian" वंशाचे लोक मध्य आशियातील "सायबेरिया" या प्रांतातून भारतात स्थलांतरित झाल्याचा इतिहास क्रमवार मांडला होता.त्याला पुष्टी देणारे हे संशोधन आहे.या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लाड सका(शाखीय) वाणी समाजाच्या कुलदेवता, कुलाचार, कुल,कुलग्राम,कुलनाम,गोत्र,धार्मिक संकल्पना,सामाजिक चालीरिती या गोष्टींचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.त्याचा उहापोह या अभ्यासगटात वेळोवेळी केलेलाच आहे.तो सर्वांनी अवश्य वाचावा व आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया या अभ्यासगटात अवश्य नोंदवाव्या.ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाषी,

प्रा.डाॅ.दिलीप बाळकृष्ण वाणी

व्यवस्थापक

फेसबुक वरील "History of Lad Saka (Shakhiy) Wani Samaj" हा सार्वजनिक अभ्यास गट(सभासद संख्या - दीड लाख)

Recent Posts

See All
कुलग्राम व कुलनाम

सर्वांच्या माहितीसाठी लाड सका(शाखीय) वाणी समाजातील धार्मिक कार्ये ज्यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली जातात त्या नाशिकच्या सर्व...

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page