"भारतीय रागदारी - भाग - २४"
- dileepbw
- Sep 4, 2023
- 1 min read
"भारतीय रागदारी - भाग - २४"
©दिलीप वाणी,पुणे
माझ्या "भारतीय रागदारी" या लेखमालेला प्रतिसाद देणार्या सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद ! तीर्थरूपांच्या सततच्या बदल्यांमुळे माझी "संगीत साधना" थांबली.त्यामुळे संगीताचे विशेष ज्ञान प्राप्त करू शकलो नाही.त्यामुळे "जो राग कानाला चांगला वाटतो तो आवडता" असे मी समजतो.तो का आवडतो याचा वैद्यकीय अभ्यास आता सुरू केला आहे.त्याला Dopamine,Serotonin, Oxytocin असे नानाविध Neurotransmitter जबाबदार असतात असे आत्ताशी लक्षात येऊ लागले आहे.वेळ आली की सांगेन. सध्या केवळ "कानसेन" होण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून काय गवसले ? ऐका.
"संगीत" हे न संपणारे विश्व आहे.ह्यात चांगले अनुभव घेणारे खूप दिग्गज आहेत.संगीतात कोणीही एकटी व्यक्ती एक नंबरला असे काहीही नसते.फक्त "सीनिअर लोक" असतात,ज्यांनी खूप रियाज,प्रॅक्टीस,हार्डवर्क व वाचन केले ते महान झाले.
गायक के.एल.सैगल व संगीतकार खेमचंद प्रकाश यांना आपण पाहिलेले नाही.आपल्या जन्माआधीच संगीतकार गुलाम हैदर लाहोरला निघून गेले होते. नशिबाने आपल्याला शंकर जयकिशन,हसरत जयपूरी,शैलेंद्र,नौशाद,अनिल विश्वास,लता,रफी, मुकेश,मन्ना डे,हेमंतकुमार ही दिग्गज मंडळी पहायला व ऐकायला मिळाली.
उस्ताद नुसरत फतेह अली खान,उस्ताद झाकीर हुसैन,उस्ताद तारी खान,उस्ताद बडे घुलाम अली खान,उस्ताद मेहेदी हस्सान,उस्ताद गुलाम अली,पंडित भीमसेन जोशी,पंडित वसंराव देशपांडे
,पंडित जसराज,पंडित शिवकुमार शर्मा,लता मंगेशकर,आरडी बर्मन,किशोर कुमार,मोहम्मद रफी,लक्ष्मीकांत प्यारेलाल,शंकर जयकिशन,मदन मोहन,बप्पी लहरी,एस डी बर्मन,इल्लैयाराजा,ए आर रहमान असे आपल्या शरीरात Neurotransmitters निर्माण करणारे एकाहून एक भारी "जादूगार" आपल्या आयुष्यात येऊन गेले हे आपले महत्भाग्यच समजायचे.
Comentarios